धुळे - शहरात शिवसेनेचा माऊली संवाद कार्यक्रम पारपडला. शहर आणि जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नांना आदेश बांदेकरांनी अतिशय सुंदर उत्तर देऊन त्यांचे समाधान केले. या वेळी आदेश बांदेकर यांनी महिलांसोबत शिवसेनेच्या गाण्यावर ठेका देखील धरला.
धुळे शहरातील शाहू महाराज नाट्य मंदिरात शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत माऊली संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी आदेश बांदेकर यांना विविध प्रश्न विचारले. काही महिलांनी त्यांना नाव घेण्यास सांगितले, तर काही महिलांनी त्यांना धुळ्यात कधी येणार असे प्रश्न विचारून त्यांची फिरकी घेतली. यावेळी आदेश बांदेकर यांनी महिलांच्या आणि तरुण मुलींच्या प्रश्नांना हसतखेळत समर्पक उत्तर दिली. यावेळी महिलांना रंगमंचावर बोलवून बांदेकरांनी त्यांना खेळ खेळण्यास सांगितले. अतिशय आनंदात आणि मनमोकळा संवाद साधत आदेश बांदेकर यांनी महिलांना खळखळून हसवले.