धुळे - जिल्ह्यातील शेतकरी सुजलाम्-सुफलाम् करण्याचा प्रयत्न करू. तसेच ग्रामीण भागात विकास करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे आश्वासन राज्यमंत्री तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. जिल्ह्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी सदैव प्रयत्नशील राहील, असेही ते म्हणाले. शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी, महापालिका आयुक्त अजीज शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - अब्दुल सत्तारांच फडणवीसांना शिवभोजन थाळीचं आमंत्रण; सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यासोबत घेतला आस्वाद
यावेळी पालकमंत्र्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यानंतर पोलिसांचे पथसंचलन पार पडले. तसेच शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.