धुळे - महिनाभरानंतर धुळ्यात थंडीचा ( People Face Heavy Cold At Dhule ) जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारी धुळ्यात कडाक्याची थंडी होती. दोन-चार दिवस ढगाळ हवामान होते. सोमवारी आकाश निरभ्र होते. त्यामुळे थंडीचा जोर ( Heavy Cold In Dhule ) आणखी वाढला. सोमवारी सकाळी धुळ्यात ५ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे धुळ्यात यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची ( Dhule Recorded the lowest Temperature In This Year ) नोंद झाली. चार दिवसात तापमान ६ अंशाने खाली घसरल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.
चार दिवसाच्या तापमानावर परिणाम धुळ्यातील चार दिवसाच्या तापमानावर एक दृष्टिक्षेप, शुक्रवार, ६ जानेवारी या दिवशी ११ अंश सेल्सिअस. शनिवार, ७ जानेवारी या दिवशी ११.५ अंश सेल्सिअस रविवार, ८ जानेवारी या दिवशी ८.६ अंश सेल्सिअस. सोमवार, ९ जानेवारी या दिवशी ५ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे गेल्या चार दिवसात धुळ्यातील तापमान कमालीचे घाली घसरले आहे. पारा खाली घसरल्याने नागरिकांना थंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे.
10 डिसेंबरला होते 5.5 अंश तापमान महिनाभरापूर्वी म्हणजे १० डिसेंबर या दिवशी तापमान ५.५ अंश सेल्सिअस होते. महिनाभरानंतर धुळ्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारी धुळ्यातील तापमान खाली घसरुन 5 अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
शेतकरी, नागरिकांना आवाहन चार दिवसात तापमान ६ अंश सेल्सिअसने खाली घसरले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका रब्बी पिकांसाठी फायदेशीर असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगतात. मात्र थंडी बरोबर पहाटेच्या वेळी पडणारे धुके आणि कधी निरभ्र तर कधी ढगाळ हवामान याचा रब्बी पिकांवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची थंडीत काळजी घ्यावी, गुरांच्या गोठ्यात उबदार वातावरण राहण्यासाठी पुरेश्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी थंडीत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. गरम, उबदार कपडे परिधान करावे, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे. सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी ( Dhule Recorded the lowest Temperature ) याचा त्रास होऊ शकतो. तसेच सांधेदुखी, हृदयरोग असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन देखील वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.
शाळा सकाळी नऊ वाजता भराव्यात थंडीचे वाढते प्रमाण पाहता सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळा सकाळी ९ वाजता भराव्यात अशी मागणी युवा सेनेने गेल्याच आठवड्यात शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. थंडीमुळे लहान मुलांना त्रास होतो. जेवढे शिक्षण महत्वाचे तेव्हढेच आरोग्य देखील महत्वाचे हे लक्षात घेऊन शिक्षणाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी युवा सेनेने केली आहे. दरम्यान, वाढती थंडी व्यायाम प्रेमींसाठी पर्वणीच ठरल्याने व्यायाम करणाऱ्यांचा उत्साह अधिक वाढला आहे. दुसरीकडे बाजारात गरम कपड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.