ETV Bharat / state

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वराचे पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान

तालुक्यातील अंजनविहीरे गावातील एका वधू-वराने बोहल्यावर चढण्यापूर्वी पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान केले आहे.

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वराचे पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान
author img

By

Published : Apr 24, 2019, 5:22 PM IST

धुळे - तालुक्यातील अंजनविहीरे गावातील एका वधू-वराने बोहल्यावर चढण्यापूर्वी पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान केले आहे. दुष्काळाला हरविण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने या गावात सध्या श्रमदान सुरू आहे. या श्रमदानात वधू-वराने श्रमदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वराचे पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान

दुष्काळाला हरवण्यासाठी अभिनेता आमीर खान यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेला धुळे तालुक्यातदेखील सुरुवात झाली आहे. या स्पर्धेला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून विविध गावांनी या स्पर्धेत उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला आहे. धुळे तालुक्यातील अंजनविहीरे या गावानेदेखील या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

या गावात संदीप आणि अंजली यांचा विवाह संपन्न होणार होता. या वधू-वराच्या अंगाला हळदही लागली होती. तरीही या दोघांनी आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून बोहल्यावर चढण्यापूर्वी श्रमदान करून स्पर्धेत योगदान दिले. दुष्काळाची झळ आपल्याला सोसावी लागत आहे. ती पुढच्या पिढीला बसू नये, यासाठी आपण पुढाकार घेतल्याचे या जोडप्याने सांगितले.

Intro:धुळे तालुक्यातील आंजनविहीर गावातील एका नवविवाहित दाम्पत्याने बोहल्यावर चढण्यापूर्वी श्रमदान करून वेगळा आदर्श निर्माण केला. सध्या या गावात पाणी फाऊंडेशनच्या वतीने श्रमदान सुरु आहे. दुष्काळाला हरविण्यासाठी पाणी फाऊंडेशनने सुरु केलेल्या या कार्यात या जोडप्याने आपलं योगदान दिल. धुळे तालुक्यात हे जोडपं सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. Body:दुष्काळाला हरविण्यासाठी अभिनेता अमीर खान यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेला धुळे तालुक्यात देखील सुरुवात झाली आहे. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत असून विविध गावांनी या स्पर्धेत उस्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत धुळे तालुक्यातील अंजनविहीर या गावाने देखील सहभाग घेतला आहे. या गावात चि संदीप आणि चि सौ कां अंजली यांचा विवाह संपन्न होणार होता. दोघा दाम्पत्याच्या अंगाला हळद देखील लागली होती. मात्र या समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून या नवविवाहित दाम्पत्याने बोहल्यावर चढण्यापूर्वी या स्पर्धेत आपलं योगदान देत श्रमदान केल. दुष्काळाची जी झळ आपल्याला सोसावी लागली ती पुढच्या पिढीला सोसावी लागू नये यासाठी आपण पुढाकार घेऊन या सामाजिक कार्यात आपलं योगदान देण्याच्या पवित्र भावनेतून या जोडप्याने या स्पर्धेत श्रमदान केलं. सध्या या जोडप्याची संपूर्ण धुळे तालुक्यात चर्चा सुरु असून त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.