ETV Bharat / state

'त्यांनी' ट्विटद्वारे थेट गृहमंत्र्यांजवळच केली तक्रार; पाहा त्यानंतर काय झाले ते...

गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर धुळे तालुका पोलीस खडबडून जागे होऊन प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पाठपुरावा करू लागले आहेत. या प्रकरणांमध्ये या पीडित कुटुंबीयांना बहिष्कृत करणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

khordad tanda dhule district
खोरदड तांडा धुळे जिल्हा
author img

By

Published : Jul 8, 2020, 7:53 PM IST

धुळे - वर्षभरापूर्वी धुळे तालुक्यातील खोरदड तांडा येथील बंजारा समाजातील काही कुटुंबीयांना बंजारा समाज जातपंचायतीने बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. एका विनयभंग गुन्ह्यात जामीन दिल्याप्रकरणी या जातपंचायतीने या पाच कुटुंबीयांना जातीबाहेर काढत त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. गावातील काही गाव-गुंडांनी या पाचही कुटुंबीयांना अतोनात त्रास देण्यास सुरुवात केल्याचे या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

पोलिसात तक्रार देऊन देखील कुठल्याही प्रकारे कारवाई पोलिसांतर्फे केली जात नसल्याचे या पीडित कुटुंबियांनी सांगितले. परंतु, या प्रकरणांमध्ये कुठल्याही मार्गाने न्याय मिळत नाही. हे बघून कुटुंबातील एका सदस्याने थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्विट करून सर्व आपबीती कळवली आणि न्यायाची मागणी केली. या ट्विटला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ प्रतिसाद देत याप्रकरणाची संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

पीडितांनी ग्रामपंचायतीने बहिष्कृत केल्याची तक्रार गृहमंत्र्यांना ट्विटद्वारे दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश

हेही वाचा... वऱ्हाड्याचा झटका; वर्ध्यात लग्नानंतर 7 दिवसानी चक्क नवरदेवच निघाला कोरोनाबाधित...

गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर धुळे तालुका पोलीस खडबडून जागे होऊन प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पाठपुरावा करू लागले आहेत. या प्रकरणांमध्ये या पीडित कुटुंबीयांना बहिष्कृत करणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी पाणी भरू न देणे, गावात किराणा, औषधे, खरेदी करू न देणे, पिठाच्या गिरणीवर येऊ न देणे, लग्न, धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधीला हजर राहू न देणे, मुला-मुलींचे लग्न जमू न देणे, पीडित कुटुंबाला खोरदड तांड्यातील त्यांच्या घरांमध्ये राहू न देणे, आदी प्रकारे जातपंचायतीच्या पंचांनी जाच दिल्याची व्यथा तक्रारदार यांनी 'अंनिस'कडे मांडली होती. या प्रकरणी 'अंनिस'चे राज्य कार्याध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार अ‌ॅड. विनोद बोरसे यांनी याप्रकरणात यापूर्वी हस्तक्षेप करून याचा पाठपुरावा केला आहे.

याबाबत ग्रामपंचायतीच्या बाकी सदस्यांकडून या सर्व आरोपांना फेटाळण्यात आले आहे. असे काही घडलंच नसल्याचे या ग्रामपंचायत सदस्यांनी व सरपंच यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पुढील चौकशी करून कारवाईचे आदेश खुद्द पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.