धुळे : शहरातील नामांकित जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट च्या शिक्षण संस्थेत ( Jaihind Educational Trust ) १९ वर्षात दोन शिक्षकांचा नेमणुकीचा प्रस्ताव बनावट दस्तावेज तयार करून शिक्षण उपसंचालक यांची दिशाभूल करून या दोन शिक्षकांच्या पद मान्यता मंजूर करून त्या दोघं शिक्षकांना संस्थेत रुजू करून घेऊन शासनाची आणि संस्थेची देखील दिशाभूल केल्याची फिर्याद याच संस्थेच्या एका सदस्याने केल्यानं अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार १७ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, डॉक्टर, इंजिनिअर, कॉन्ट्रॅक्टर, प्राचार्य, प्राध्यापक, संस्थेतील सदस्य असलेली भाजपची एक महिला नगरसेविका, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, शिक्षक यांचा समावेश आहे. धुळ्यातील नाव लौकिक असलेल्या या संस्थेचे अश्या पद्धतीनं लौकिक चव्हाट्यावर आल्यानं धुळ्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग या गुन्हयाचा पुढील तपास करत आहे : शिक्षक प्रभाकर रोहिदास चौधरी, शिक्षिका मीना सजन पाटील दोघांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नेमणुकीचा प्रस्ताव तयार करून शिक्षण उपसंचालक,नाशिक विभाग यांच्याकडे मान्यते प्रस्ताव पाठवून शिक्षण उपसंचालक यांची दिशाभूल करून शिक्षक प्रभाकर रोहिदास चौधरी, शिक्षिका मीना सजन पाटील या दोघाची मान्यता मंजूर करून त्यांना संस्थेत रुजू करून घेऊन संस्थेची व शासनाची फसवणूक केली म्हणून देवपूर पोलीस स्टेशनला भा.दं.वि ४०६, ४१५, ४२०, ४६८, ४६९, ४७१, ४७२,१२० - ब , ३४ अन्वये गुन्हा दाखल झालाय. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग या गुन्हयाचा पुढील तपास करत असल्याची माहिती देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम टी निकम यांनी दिली.