धुळे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेतला धुळे जिल्ह्यात शांततेत सुरुवात झाली. या परीक्षेसाठी धुळे जिल्ह्यात २५ हजार २६४ विद्यार्थी बसले आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी या ठिकाणी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज पासून म्हणजे १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला सुमारे १ लाख ६६ हजार ४७८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. धुळे जिल्ह्यात ४४ केंद्रांवर २५ हजार २६४ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. या परीक्षेसाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून कॉपी मुक्त परीक्षा पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे, परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.