देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्यानं नागपुरात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष - DEVENDRA FADNAVIS
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/04-12-2024/640-480-23042907-thumbnail-16x9-nagapur.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Dec 4, 2024, 9:14 PM IST
नागपूर : बीजेपी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एकमताने निवड झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात भाजपाचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत. उपराजधानी नागपूरमध्येही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी फुगडी घालून लाडक्या फडणवीसांचं अभिनंदन केलं.
विदर्भाच्या स्वप्नांना पंख लागले : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या शपथ घेणार आहेत. 2014 ते 19 या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी विदर्भात फार मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प राबवण्यात आले. आता परत एकदा ते मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असल्यानं विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस ज्यावेळी नागपूरला येतील, त्यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत करू असा निर्धार भाजपा महिला कार्यकर्त्यांनी केला.