ETV Bharat / state

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यास साधू महंतांना विशेष निमंत्रण - INVITATION TO SADHU MAHANTS

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यास नाशिकमधील काही साधू-महंतांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्या हे सर्वजण शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

अनिकेतशास्त्री आणि फडणवीस
अनिकेतशास्त्री आणि फडणवीस (ईटीव्ही बातमीदार)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2024, 9:26 PM IST

नाशिक - महायुती सरकारचा उद्या शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे. त्याची तयारी पूर्ण होत आली आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून या शपथविधीसाठी देशभरातून साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी नाशिकचे डाॅ. अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांना निमंत्रण मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर रंगणार्‍या या ऐतिहासिक सोहळ्यात, राज्य शासनानं त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केलं आहे. त्यात रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास, महंत गणेशानंद सरस्वती, महंत रमणगिरी महाराज, माधवदास राठी, ह.भ.प. संजय धोंडगे, महंत सुधीरदास पुजारी, स्वामी संविदानंद सरस्वती, कांचनताई जगताप अशा मान्यवरांचा समावेश आहे. तसंच महंत डाॅ. अनिकेतशास्त्री देशपांडे यांचं नाव या यादीत विशेष उल्लेखनीय आहे.

धर्माचार्यांना विशेष स्थान - वारकरी संप्रदाय आणि हिंदू संस्कृतीचे जतन करणार्‍या या सरकारमध्ये धर्माचार्यांना विशेष स्थान आहे. आध्यात्मिक समन्वय आघाडीचे सहप्रदेशाध्यक्ष ह.भ.प. संजय धोंडगे यांनी या निमंत्रणाबद्दल आनंद व्यक्त केला. तर देश, धर्म आणि संतांचा सन्मान करणाऱ्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रण मिळणं हे माझं भाग्य समजतो, असं
भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषारशास्त्री भोसले यांनी सागितलं.

सर्वांगीण विकासासाठी बळ मिळेल - राज्याच्या राजकीय पटलावर एक नवा सूर्य उगवत असताना, धर्माच्या प्रकाशानेही त्यांचे तेज वाढवले जाणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी नाशिकच्या पवित्र भूमीवरून सनातन हिंदू धर्मध्वजाचे वाहक, श्रद्धेचे प्रतीक, ज्ञानाचे सागर असे महंत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या शुभाशीर्वादाने नवीन सरकारला राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी बळ मिळेल, अशी अपेक्षा महंत डाॅ. अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा..

  1. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस घेणार तिसऱ्यांदा शपथ; वाचा का आहेत फडणवीस 'विक्रमादित्य'?
  2. देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा, एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीवर प्रश्नचिन्ह कायम
  3. "शिंदेंचं संध्याकाळपर्यंत समजेल, पण मी शपथ घेणार", अजित पवारांच्या विधानानंतर शिंदे म्हणतात...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.