धुळे - अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची केंद्रीय समितीच्या पथकाने धुळे तालुक्यातील आर्वी येथे पाहणी केली. त्यानंतर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले. यावेळी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या विभागाचे सल्लागार दिनानाथ या पथकामध्ये होते.
हेही वाचा - बीड : केंद्रीय पथक पाहणीसाठी येण्याआधीच शेतकऱ्याची आत्महत्या; निपाणी टाकळी येथील घटना
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र यांनी धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी गंगाधरन डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार किशोर कदम, उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाने, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - नागपूर मनपावर कमळ फुललं, महापौरपदी संदीप जोशींची निवड