धुळे- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढतच असून काल दिवसभरात तब्बल 141 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, 5 जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 52 वर जाऊन पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 139 झाली आहे.
जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्ये सोबत आरोग्य यंत्रणेची चिंता देखील वाढली आहे. जिल्हा रुग्णालयाला रॅपिड अँटिजेन टेस्ट किटचा तुटवडा भासत आहे. याबाबत रुग्णालयाने वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला असून तुर्तास किट उपलब्ध नसल्याने टेस्ट बंद आहेत.
गेल्या 9 दिवसात अँटिजेन किटचा वापर केल्याने 77 जणांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. यावर, किटचा तुटवडा आहे, याबद्दल शासनाकडे प्रस्ताव नोंदवला आहे, शिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील मागणी केली आहे. लवकरच किट उपलब्ध होतील, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली.
हेही वाचा- धुळ्यात एकाच दिवशी कोरोनाने 6 जणांचा मृत्यू