धुळे - शहरातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 50 हजार विद्यार्थ्यांसाठी पुस्तक संचांची मागणी महानगरपालिका शिक्षण मंडळाकडे करण्यात आली होती. यात मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या पुस्तकाचा समावेश आहे. शासनाकडून 85 टक्के पुस्तके मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महानगर पालिका प्रशासनाने दिली आहे.
धुळे शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेचे पुस्तक मोफत देण्यात येत असतात. विद्यार्थी संख्येनुसार या पुस्तकांची मागणी होत असते. जिल्ह्यातील व सर्व माध्यमातील शिक्षक शाळातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येत असतात. याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असतो. यापूर्वी सर्व शिक्षा अभियानांतर्गत ही पुस्तके दिली जात होती. मात्र, आता पहिली ते बारावीपर्यंतचा समावेश समग्र शिक्षा अभियान अंतर्गत केला आहे. यामार्फत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप होणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी यांनी दिली.