धुळे - धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा आमदार कुणाल पाटील यांनी पुन्हा एकदा वर्चस्वप्रस्थापित केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. सरपंच पदाच्या उमेदवारांसह सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्यही काँग्रेस पक्षाचेच विजयी झाले आहेत. धुळे जिल्ह्यात भाजप १७, महाविकास आघाडी २५, शिंदे गट ४ तर ठाकरे गटाची एक ग्रामपंचायत विजयी झाली आहे.
या ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा
खंबाळे : सतीबाई आसाराम पावरा
वाघाडी : किशोर विठ्ठल माळी
करवंद : हिरामण हुला भिल
वरझडी : दिलीप संभू पावरा
मांजरोद : गोजरबाई श्रावण भिल
अर्थे बुद्रुक : मनीषा मनोहर पाटील
अर्थे खुर्द : वंदना दीपक गुजर
अजंदे बुद्रुक : तुळसाबाई श्यामराव भिल
हाडाखेड : सुरेश अत्तरसिंह पावरा
थाळनेर : मेघा संदीप पाटील
अजनाड : दरबार गंगाराम जाधव
महादेव दोंदवाडे : संगीता किसन पावरा
तऱ्हाडकसबे : महेश अरुण सावळे
खर्दे पाथर्डे : सुशीला काशिनाथ भिल
तोंदे : राहुल रुपसिंह चौधरी
हिसाळे : उत्तम माला पावरा
बोराडी : सुखदेव खुमान भिल (बिनविरोध)