ETV Bharat / state

कोणी घर देता का रे घर..?, धुळ्याच्या 'नटसम्राटाची' आपल्या पाल्यांकडून अवहेलना - कोणी घर देता का रे घर..?

कोणी घर देता का रे घर, एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून हिंडत आहे, कोणी घर देता का रे घर, या 'नटसम्राट' मधील वाक्यांची प्रचिती धुळ्याच्या आनंदा जगन्नाथ थानक यांना आली आहे.

आनंदा थानक
author img

By

Published : Nov 2, 2019, 10:09 PM IST

Updated : Nov 2, 2019, 11:13 PM IST

धुळे - कोणी घर देता का रे घर, एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून हिंडत आहे, कोणी घर देता का रे घर, या 'नटसम्राट'मधील वाक्यांची प्रचिती धुळ्याच्या आनंदा जगन्नाथ थानक यांना आली आहे. धुळ्याच्या तालुक्यातील वर्धाने येथील हे वयोवृद्ध आज साक्री तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. याचे कारण होते. त्यांची मुलं आणि मुली.

कोणी घर देता का रे घर..?

आनंदा थानक यांना राजेंद्र आनंदा थानक, कल्याण आनंदा थानक, ललीता पुरोहित, ज्योतीबाई पुरोहित अशी मुलं. मुलगा, मुलगी एक समान या वाक्याप्रमाणे आनंदा यांनी आपली सर्व संपत्तीचे चार समान वाटे करून चौघांनी दिले. म्हातारपणी आपला सर्वजण मिळून सांभाळ करतील हीच त्यांची आशा होती. परंतु, मुले आणि सुना त्यांच्या पोटासाठी साध्या भाकरीसाठीही तरसवू लागले. सध्या ते एका मंदिरात राहत असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्या मंदिरातील लोकच करत आहेत.

आपली मुले या जगात ताठ मानेने जगावीत, यासाठी काबाडकष्ट करून, उन्हाळे, पावसाळे झेलून काही संपत्ती कमावली. आज तीच मुले त्यांच्या संपत्तीतून त्यांना हाकलून लावली आहेत. मागील चार वर्षांपासून त्यांचीच मुले त्यांची हेळसांड करत आहेत. आता त्यांना न्याय मिळावा यासाठी ते शासन दरबारी हेलपाटे मारून थकले. शेवटी त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. ते आज (शनिवार) साक्री तहसील कार्यालयात पेट्रोलची बाटली, आगपेटी घेवून ते पोहोचले. पण, साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बनसोडे, गोपनीय शाखेचे कर्मचारी अविनाश पाटोळे, निजामपूर गोपनीय शाखेचे बागुल यांनी वेळीच पोहोचत त्यांनी झाडाझडती घेतली आणि त्यांच्याजवळी पेट्रोलची बाटली, आगपेटी काढून घेतली.

सध्या त्यांची एकच मागणी आहे, की ज्यांसाठी मी एवढे काही केले, तेच आज माझ्याकडे पाहत नाहीत. माझी संपत्ती मला परत मिळावी. जेणेकरून उरलेले आयुष्य मी सुखाने राहील, अशी ते आर्त ते शासन दरबारी लावत आहेत.

यावेळी तहसीलदार कार्यलयात निवासी नायब तहसिलदार असटक यांची भेट घेऊन आपल्या प्रकरणा संदर्भात सविस्तर कागदपत्र जमा करून उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे अपील दाखल करून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आनंदा यांनी सांगितले.

हेही वाचा - दिवाळीपुरतं तरी घरी न्या! त्यांची काळजाच्या तुकड्याला 'आर्त' हाक

Intro:धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वर्धाने येथील वयोवृद्ध जेष्ठ नागरिक आनंदा जगन्नाथ थानक यांनी आपल्या मुलांनकडून छळ केला जात असल्याने साक्री तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.Body:
वैजापूर तसेच ,राजस्थान याठिकाणी असलेल्या मिळकती बेकायदेशीर हडप केली असुन आनंदा थानक यांनी आपली मिळकत परत मिळावी यासाठी पंतप्रधान,मुख्यमंत्री,जिल्हा अधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी,पोलीस निरीक्षक साक्री तहसीलदार,यांना निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी वयोवृद्ध जेष्ठ नागरिकाला जगावे की मरावे अशी अवस्था झाली आहे. पोटाच्या मुलांनी वडीलांना लाथ मारली असुन घोर निराशा झाली आहे. राजेंद्र आनंदा थानक आणि सुन बबीता,कल्याण आनंदा थानक यांच्या विरोधात शासनदरबारी अनेक वेळा तक्रारी देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने मला आत्मदहन केल्या शिवाय पर्याय नाही.
याप्रसंगी साक्री तहसील कार्यालयात आनंदा थानक दाखल होताच साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बनसोडे,गोपनीय शाखेचे कर्मचारीअविनाश पाटोळे,निजामपुर गोपनीय शाखेचे बागुल यांनी झाडाझडती घेतली.यावेळी त्यांच्या खिशातील पेट्रोल भरलेली बाटली आणि आगपेटी हिसकावून घेत ताब्यात घेतले.

यावेळी तहसीलदार यांच्या कार्यलयात निवासी नायब तहसिलदार असटक यांची भेट घेऊन आपल्या प्रकरणा संदर्भात सविस्तर कागदपत्र जमा करून उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.Conclusion:
Last Updated : Nov 2, 2019, 11:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.