ETV Bharat / state

Ajit Pawar : पाडापाडीचे राजकारण केले तर याद राखा, मेळाव्यात अजित पवारांची पदाधिकाऱ्यांना तंबी - धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाल्याची नाराजी व्यक्त करीत, आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पाडापाडीचे राजकारण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार
author img

By

Published : Jun 16, 2023, 7:56 AM IST

विरोधी पक्षनेते अजित पवार

धुळे : उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची संख्या कमी झाल्याने विरोधी पक्ष नेते अजित पवार नाराजी व्यक्त केली आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेतून बाहेर काढून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी पक्ष मेळाव्यात केले. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन करत असताना अजित पवार यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना तंबीदेखील दिली आहे.

कार्यकर्त्यांना आवाहन : जातीय दंगली घडवून पुरोगामी महाराष्ट्रात धर्मांधता पसरविणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार निवडून द्यावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे केले. दोंडाईचा शहरातील केशरानंद नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. भाजप जातीय दंगली घडवून महागाई, बेरोजगारी, विकासाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करत असल्याचा आरोपदेखील यावेळी त्यांनी केला.

जास्त आमदार द्या : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार ज्यावेळेस एक वर्षांपूर्वी गद्दारी करून आणल्या गेले. त्यात पन्नास खोके एकदम ओके. महाराष्ट्राला याच्या आधी 50 कोटी एकदम मुख्य माहिती नव्हतं ते कोणी माहिती करून दिलं.? तर या गद्दारांनी करून दिले. धुळे नंदुरबार जिल्ह्यातून एकही आमदार नाही, असे चालणार नाही. दोन्ही जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार मिळाले पाहिजे. पुन्हा एकदा हे उलट्या पायाचे सरकार आपल्याला बाजूला करायचे आहे.

कोणाचे काय चुकले : महाविकास आघाडीचे सरकारचा दोन वर्ष कार्यकाळ झाला असताना शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांनासोबत घेऊन बंड केले. भाजपच्या मदतीने त्यांनी बंड करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आणले. यावर परत एकदा अजित पवार यांनी टीका केली. सरकार व्यवस्थित चालू असताना बंड का केले. कोणाचे काय चुकले असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला. एकनाथराव शिंदे मुंबईतून सुरतला गेले. सुरतवरून गोव्याला तिथून आले. परत मुंबईला आले, अरे तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करायला निघाला अशा पद्धतीने असे काय घडले होते, कुणाचे काय चुकले होते. अचानक नवीन सरकार स्थापन करावे लागले, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात बोलताना सांगितले.

या नेत्यांची मेळाव्याला उपस्थिती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मेळाव्यात दोंडाईचा शहरातील ज्ञानेश्वर भामरे यांनी राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी होऊन पक्षात प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधान परिषद माजी अध्यक्ष अरुण गुजराती उपस्थित होते. या मेळाव्यात माजी कामगार मंत्री हेमंत देशमुख, आमदार अनिल पाटील, माजी आमदार अनिल गोटे, पक्ष निरीक्षक अर्जुन टिळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar : जाहिरातबाजीने शिंदेनी स्वत:चं हसं केलं - अजित पवार
  2. Warkari Lathicharge News : वारकऱ्यांवरील लाठीमाराची घटना क्लेशदायक, पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे; लाठीमाराच्या घटनेवर विरोधकांच्या प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.