ETV Bharat / state

भीक मागणाऱ्या महिलेला धुळ्यात टँकरने चिरडले!

मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रस्त्यावरती भीक मागणाऱ्या महिलेला मुंबईकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुधाच्या टँकरने चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

a beggar woman died in accident at dhule
धुळ्यामध्ये भीक मागणाऱ्या महिलेला टँकरने चिरडले!
author img

By

Published : Apr 12, 2020, 8:03 PM IST

Updated : Apr 12, 2020, 10:29 PM IST

धुळे - रविवारी दुपारी धुळे शहराजवळील मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रस्त्यावरती भीक मागणाऱ्या महिलेला मुंबईकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुधाच्या टँकरने चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. लॉकडाऊन दरम्यान हातावरती पोट असणाऱ्या मजुरांचे अतोनात हाल होत असताना, हा मृत्यू धक्कादायक आहे. संबंधीत टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

धुळ्यामध्ये भीक मागणाऱ्या महिलेला टँकरने चिरडले!

सध्या सर्व काम धंदे बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांना पोट भरण्याचा मार्ग सापडत नाही. अपघातात मरण पावलेली महिला मोहाडी परिसरातच राहते. तिच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Last Updated : Apr 12, 2020, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.