ETV Bharat / state

Dragon Fruit Farming: ड्रॅगन फ्रुट शेतीच्या माध्यमातून झाले लखोपती; वाचा ७४ वर्षीय शेतकरी पाटलांची प्रेरणादायी कहाणी - became a millionaire dragon fruit farming

धुळे तालुक्यातील मेहेरगांव-नवलाणे शिवारात ७४ वर्षीय गुलाबराव त्र्यंबकराव पाटील यांची सात एकर ड्रॅगन फ्रुट शेती आहे. (Dragon Fruit Farming) सन २०१६ पर्यंत ते पारंपरिक पिकं घेत होते. मात्र, २०१६ पासून त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार पारंपरिक पिकं न घेता ड्रॅगन फ्रुटची आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. दोन एकर क्षेत्रात लावलेल्या ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून चार लाखाचे उत्पन्न घेतले आहे. आणखी किमान १६ लाखाचे उत्पन्न या दोन एकर क्षेत्रात लावलेल्या ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून अपेक्षित असल्याचं पाटील सांगतात.

ड्रॅगन फ्रुट
ड्रॅगन फ्रुट
author img

By

Published : Sep 21, 2022, 8:03 PM IST

धुळे - शेती करणं परवडत नाही. काय आहे शेतीमध्ये. एखादी आपली नोकरी केलेली बरी असं म्हणणाऱ्यांना ७४ वर्षाच्या आजोबांनी आधुनिक शेती करत चपराक दिली आहे. तशाच त्यांचा शेती कामातील उत्साह पाहून युवकांना देखील लाजवेल असे त्यांचे कामे आहे. त्यांनी दोन एकर क्षेत्रात लावलेल्या ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून चार लाखाचे उत्पन्न घेतले आहे. आणखी किमान १६ लाखाचे उत्पन्न या दोन एकर क्षेत्रात लावलेल्या ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून अपेक्षित असल्याचं ते सांगतात. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक पद्धतीने शेती केल्यास नक्कीच चांगले उत्पन्न मिळतं, असा अनुभव असल्याचेही ते आवर्जून सांगतात.

ड्रॅगन फ्रुट शेतीबद्दल बोलताना शेतकरी

धुळे तालुक्यातील मेहेरगांव- नवलाणे शिवारात ७४ वर्षीय गुलाबराव त्र्यंबकराव पाटील यांची सात एकर ड्रॅगन फ्रुट शेती आहे. सन २०१६ पर्यंत ते पारंपरिक पिकं घेत होते. मात्र, २०१६ पासून त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार पारंपरिक पिकं न घेता ड्रॅगन फ्रुटची आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. वेलवर्गीय, साबरचा हा प्रकार पाहून त्यावेळी गावातील काहींनी, काही आप्तस्वकीयांनी त्यावेळी नकारात्मकता दर्शवली होती. मात्र, खचून न जाता ड्रॅगन फ्रुट शेतीची माहिती घेऊन त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले. ड्रॅगन फ्रुटची लागवड केल्यानंतर साधारण दीड वर्षानंतर ड्रॅगनच्या वेलवर्गीय साबरला फळधारणा होते. ड्रॅगनच्या लागवडीसाठी जेवढी मुरमाड, हलक्या प्रतीची जमीन असेल तेवढे चांगले असते. कारण अशा जमिनीत या पिकासाठी मिळणारे खनिज उत्तम असते अस ७४ वर्षीय आजोबा त्यांच्या अनुभवाने सांगतात.

ड्रॅगन फ्रुट
ड्रॅगन फ्रुट

पाणी - खतं व्यवस्थापन - सगळ्यात महत्वाचे म्हणजे इतर पिकांच्या तुलनेनं ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी पाणी, खतं २५ टक्क्यांपेक्षा कमी लागतं. ठिबक पद्धतीने पाणी असल्यानं पाण्याचा अपव्यय होत नाही , पाणी जपून वापरलं जातं. राहिला प्रश्न खतांचा तर ही ड्रॅगन शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीची असल्यानं रासायनिक अंश सापडण्याचा प्रश्नच उदभवत नाही असं ७४ वर्षीय गुलाबराव त्र्यंबकराव पाटील हे शेतकरी सांगतात. शेणखत, साखर कारखान्याची मळी खत म्हणून या पिकाला देत असल्याचं ते सांगतात. सुरुवातीला लागवड केल्यानंतर इतर पिकांसारखं तीन -चार महिन्यात उत्पन्न मिळालं नाही, म्हणून नाराज न होता याची कसर ड्रॅगनला सावली मिळावी म्हणून तसेच आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या शेवगा पिकाने भरून काढली, असं गुलाबराव पाटील हे शेतकरी आवर्जून सांगतात. लागवड खर्च एकदाच येतो , नंतर केवळ देखभाल, छाटणी असते. कीड व्यवस्थापनीसाठी त्यांनी कामगंध सापळे लावले आहेत.

ड्रॅगन फ्रुट
ड्रॅगन फ्रुट

वेलवर्गीय साबर पीक - ड्रॅगनफ्रुट हे विदेशी फळ म्हटलं जातं. मित्राच्या आग्रहाखातर ड्रॅगनची लागवड केली. स्विर्झलँड येथून ही रोप आणल्याचं ते सांगतात. साबरचा प्रकार, जंगली प्रकार असल्यानं याचा वेल दिसायला आकर्षक नसला तरी याच्या फळाचा औषधी गुणधर्म असल्यानं या फळाचं महत्व जसं जसं लोकांना समजतंय तसा या फळाचा भाव देखील वाढतो. मात्र, तो केवळ व्यापाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी नाही. गुलाबी, लाल, पिवळं आणि पांढरा या चार रंगात हे ड्रॅगन फ्रुट असते. मात्र, पाटील यांनी लावलेले ड्रॅगनफ्रुट हे लाल रंगाचे आहे.

ड्रॅगन फ्रुट
ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगनचा सिझन, लागवडीसाठी लागणारं साहित्य - ड्रॅगन फ्रुट वेलवर्गीय असल्यानं त्याला आधार म्हणून साधारण पाच फुटाचा सिमेंटचा खांब, उंच वाढ झाल्यानंतर त्याचा झालेला विस्तार संतुलित राहण्यासाठी रबरी रिंग, जाड तारेची जाळी, सळई चा पिंजरा हे साहित्य आवश्यक आहे. ड्रॅगनचा सिझन साधारण जून - जुलै ते नोव्हेंबर -डिसेंबर असा असतो, असं पाटील यांनी सांगितलं.

एकदाच लागवड - ७४ वर्षीय गुलाबराव पाटील यांनी सात एकर क्षेत्रात ड्रॅगनची लागवड केली आहे. सध्या दोन एकर क्षेत्रातील फळ तोडणी सुरु होती. आतापर्यंत साधारण २ टन उत्पन्न निघाले आहे. आणखी किमान दहा टन उत्पन्न निघण्याची अपेक्षा पाटील यांना आहे. एकूण संपूर्ण सात एकर क्षेत्रातून किमान २० टन उत्पन्न निघेल असा विश्वास शेतकरी गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. सध्या २०० रुपये किलो दराने ड्रॅगनची खरेदी होत असल्याचं ते सांगतात. त्यानुसार जर ड्रॅगनचं अर्थशास्त्र बघितलं तर केवळ दोन एकर मधून आतापर्यंत चार लाखाचं उत्पन्न घेतले आहे. आणखी किमान १६ लाखाचं उत्पन्न या दोन एकर क्षेत्रात लावलेल्या ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून गुलाबराव पाटील यांना अपेक्षित आहे. उर्वरित पाच एकर क्षेत्रातून किमान ३० ते ४० लाखाचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. सात एकरमध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी पाटील यांचा साधारण ६० लाख रुपये खर्च झाला आहे. सध्या खर्च वजा जाता त्यांना एकेरी निव्वळ ५ लाखाचा नफा होत असल्याचं ते सांगतात. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीची करावी. असा सल्ला ते युवकांना देत आहेत.

शेतकऱ्यांना बाय प्रॉडक्टसाठी सरकारनं प्रोत्साहन द्यावं - सगळ्या वस्तूंचे भाव वाढतात. मात्र, शेतकरी जेव्हा आपला शेतमाल बाजारात आणतो, तेव्हाच मार्केट डाऊन होतं, त्याच्या पदरी निराशाच येते. सगळे म्हणतात शेतकरी हा राजा आहे, आमचा अन्नदाता आहे. मात्र, या राजाला, या अन्न दात्याला काय त्रास होतो, काय त्रास आहे हे कधी कोणी जाणून घेत नाही, हीच या कृषिप्रधान देशाची शोकांतिका असल्याचे शेतकरी गुलाबराव पाटील सांगतात. ड्रॅगन फ्रुट साठी प्रक्रिया उद्योग महाराष्ट्रात तरी ऐकिवात नाही, तेव्हा असे प्रकल्प हाती घेऊन नवनवीन शेतकऱ्यांना सरकारनं प्रोत्साहित करावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ड्रॅगन फ्रूटचे औषधी गुणधर्म - मलेरिया, डेंग्यू, टायफाईड या रुग्णांच्या प्लेटलेट्स अर्थात पेशी वाढण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हे फळ गुणकारी आहे. कोरोनाच्या काळात बहुतेक रुग्णांना याची प्रचिती आली आहे. कँसर रुग्णांसाठी देखील हे फळ सर्वोत्तम असल्याचे ७४ वर्षीय शेतकरी गुलाबराव पाटील सांगतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.