धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी शिवारात शेतात कोणी नाही हे पाहून शेतातील कापूस अज्ञात व्यक्तीनं ३ ते ४ ऑक्टोबरच्या दरम्यान चोरून नेल्याची घटना (cotton stolen from cotton field) घडली. शेतातील साधारण १ हजार २०० किलो म्हणजे १२ क्विंटल कापूस चोरी (12 quintals of cotton stolen in Dhule) गेला.
काय आहे घटना - धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी शिवारात धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवानिवृत्त लिपीक भास्कर महारु साळुंखे यांची शेती (cotton field in Dhule district) आहे. सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरु आहे. अतिशय मेहनतीने शेतकऱ्याच्या शेतात पांढरं सोनं पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय, या पांढऱ्या सोन्याला म्हणजेच कापसाला सध्या बऱ्यापैकी भाव आहे.
भास्कर साळुंखे यांनी आपल्या शेतातील साधारण १ हजार २०० किलो म्हणजे १२ क्विंटल कापूस शेतात उघड्यावर असलेल्या कांदा चाळीत ठेवला होता. मात्र हा कापूस शेतात कोणी नाही हे पाहून अज्ञात व्यक्तीनं ३ ते ४ ऑक्टोबरच्या दरम्यान चोरून नेल्याचं सांळुखे यांना दसऱ्यानिमित्त शेतात ५ ऑक्टोबरला आल्यावर निदर्शनास आलं. या संदर्भात त्यांनी साक्री पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. साधारण एक लाख रुपये किंमतीचा १ हजार २०० किलो म्हणजे १२ क्विंटल कापूस अज्ञात व्यक्तीने चोरी (Theft of white gold) केला. या घटनेचा तपास साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल २९७ एन. डी. सोनवणे हे करत आहेत.
शेतकरी चिंतेत - निसर्गाचा मारा सहन करून देखील ना उमेद न होता, शेती मालाला चांगला भाव मिळेल अशी आशा, विश्वास बाळगून असलेला बळीराजा सध्या शेतीमाल चोरी होत असल्याच्या घटनेनं चिंतेत आहे. शेतकऱ्यांनी आपला शेती माल विशेषतः पांढरं सोनं कापूस हा सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असं आवाहन करण्यात येत आहे. हेड कॉन्स्टेबल २९७ एन. डी. सोनवणे यांनी केले (Cotton Stolen in Dhule) आहे.