ETV Bharat / state

Youths Drowned During Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गेलेले तीन युवक बुडाले; सावली येथील आसोलामेंढा येथील घटना - गणेश विसर्जनादरम्यान मृत्यू

Youths Drowned During Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) गेलेल्या घुग्गुस येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना जिल्ह्यात गणेश विसर्जन कार्यक्रमात (Three people drowned in water) एक मोठी दुर्घटना घडली. सावली येथील तीन युवक गणेश विसर्जनासाठी आसोलामेंढा नहरात (Asolamendha Canal) गेले असताना ते पाण्यात बुडाले. तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. निकेश गुंडावार, संदीप गुंडावार आणि गुरुदास मोहुर्ले अशी मृतकांची नावे आहेत. ही घटना समोर आल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. (Three people drowned in Chandrapur)

Youths Drowned During Ganesh Immersion
आसोलामेंढा येथील घटना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 8:34 PM IST

चंद्रपूर Youths Drowned During Ganesh Immersion: सावली येथील सार्वजनिक जय बजरंग युवा गणेश मंडळ, सावलीचा राजा, सावलीचा विघ्नहर्ता व जय बजरंग युवा गणेश युवा मंडळ अशा तीन गणेश मूर्तीचे विसर्जन होणार होते. सावली येथील असोलामेंढा नहरात मूर्तीचे विसर्जन होणार होते. त्यानुसार आज (रविवारी) ही मिरवणूक वाजत गाजत तिथे गेली. त्यापैकी सावलीचा राजा व विघ्नहर्ता हे दोन गणपती स्थानिक लहान तलावामध्ये विसर्जित करण्यात आले. तर जय बजरंग बली मंडळाचा गणपती आसोलामेंढा नहरात विसर्जन करण्यासाठी सर्वजण गेले. गणपती विसर्जन करताना पाण्याच्या प्रवाह हा अधिक असल्याने पाच जण वाहून गेले. यात दोघा जणांना तेथील लोकांना कसेबसे काढण्यात यश आले. मात्र, तीन जण बुडत वाहून गेले. यातील गुरुदास मोहूर्ले या युवकाला काही अंतरावर पकडण्यात आले. मात्र जेव्हा रुग्णालयात त्याला नेले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर गुंडावार बंधूंचे मृतदेह सायंकाळच्या सुमारास सापडले.

लहान्याला वाचवायला मोठा भाऊ गेला: एकाच कुटुंबातील दोन भाऊ यात मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. निकेश आणि संदीप गुंडावार हे अत्यंत सामान्य कुटुंबातील होते. चांदली या गावात हे दोघे भाऊ रसवंती चालवत होते. गणेश विसर्जन प्रसंगी आपला लहान भाऊ संदीप वाहून जात असताना बघताच मोठा भाऊ निकेश याने त्याला वाचविण्यासाठी लगेच नहरात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने हे दोघे भाऊ वाहून गेले. सायंकाळी त्यांचे मृतदेह सापडले.

लहान भावासाठी मोठ्याने मारली उडी: चांदली येथील निकेश व संदीप गुंडावार हे दोघे बंधू विसर्जनासाठी या ठिकाणी गेले होते. नहरात लहान भाऊ संदीप वाहून गेल्याचे कळताच त्याला शोधण्यासाठी मोठ्या भाऊ निकेशने त्याला वाचवण्यासाठी उडी मारली; मात्र पाण्याच्या प्रवाहाने दोघेही वाहून गेले. ते दोघेही सावली शहरात ऊसाचा रस (रसवंती) विकण्याचे काम हे करीत असतात. गणेश विसर्जनादरम्यान पोहता येत नसल्यास पाण्यात न उतरण्याचा सूचना वारंवार प्रशासनाकडून दिल्या जातात. परंतु, काही अतिउत्साही युवक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. अखेर काही जणांना आपले प्राण गमवावे लागतात.

हेही वाचा:

  1. Eid Milad Un Nabi 2023: ईद-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीत झेंडा उंचावला अन् तरुणाचा झाला जागीच मृत्यू
  2. Solapur News : विसर्जनादरम्यान विहिरीत बुडून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू ; चार वर्षीय मुलगा झाला पोरका
  3. Brother Sister Drown in Lake: कुत्र्याला तलावात आंघोळ घालायला गेले अन् स्वत:च बुडाले; बहीण-भावाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.