चंद्रपूर - बल्लारपूर ते नवेगाव वाघाडे या राष्ट्रीय महामार्गाचे अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. सध्या हे काम गोंडपिपरी शहरात सुरू आहे. यावेळी पंचायत समितीपासून नवीन बसस्थानकापर्यंत एकेरी रस्ता सुरू आहे. त्यामुळे मार्गावर एका बाजूने बांधकाम, तर दुसऱ्या बाजूने व्यापाऱ्यांचे अतिक्रमण असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.
हेही वाचा - श्रीमंत पेशव्यांचे दहावे वंशज राहायचे भाड्याच्या घरात, म्हणाले इतिहासाशी छेडछाड नको
गोंडपिपरी शहरात महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे सध्या रहदारीसाठी एकेरी मार्ग सुरू केला आहे. या मार्गावरील व्यापाऱ्यांचे अतिक्रमण अद्याप हटवण्यात आले नाही. परिणामी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पंचायत समितीपासून नवीन बसस्थानकापर्यंत नेहमीच वर्दळ असते. एका बाजूने खोदकाम झाले आहे, तर दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. मार्गालगत असलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानातील वस्तू, दुकानांचे शेड रस्त्यावर आले आहे. हा मार्ग सध्या एकेरी असून त्यात व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणामुळे तो पुन्हा अरुंद झाला आहे.
मार्गालगत आलेले अतिक्रमण हटवून रस्ता बांधकामाला सुरुवात करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता बांधकामाला सुरुवात झाली आहे. दुकानांचे शेड जैसे थे उभे आहेत. वाहनचालकांना याचा मोठा त्रास होत आहे. दरम्यान, मार्गालगत आलेले अतिक्रमण हटवण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.