ETV Bharat / state

दिलासादायक ! चंद्रपूर जिल्ह्यात आज 2001 जणांची कोरोनावर मात - कोरोना रुग्णांमध्ये घट चंद्रपूर

जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे, आज तब्बल 2001 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1160 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 21 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आज 2001 जणांची कोरोनावर मात

author img

By

Published : May 8, 2021, 10:38 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे, आज तब्बल 2001 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1160 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 21 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 70 हजार 548 वर पोहोचली आहे. तर एकूण कोरोनामुक्तांचा आकडा हा 54 हजार 48 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सध्या 15 हजार 10 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोना निदानासाठी आतापर्यंत एकूण 4 लाख 8 हजार 623 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 35, 52, 58, 69 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला. कोतवाली वार्ड येथील 34 वर्षीय पुरुष, तुकुम येथील 58 वर्षीय पुरुष, कृष्णा नगर येथील 38 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 42, 57, 80 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील कुर्झा येथील 80 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 18, 35 वर्षीय महिला, नागभीड तालुक्यातील किरमिटी मेंढा येथील 60 वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील धरमपूर येथील 50 वर्षीय पुरुष, भंगाराम तळोधी येथील 55 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, आरमोरी गडचिरोली येथील 70 वर्षीय महिला तर गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी येथील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1080 बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 996, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 31, यवतमाळ 37, भंडारा 10, वर्धा एक, गोंदिया एक आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात धुवावेत आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा - पाकिस्तानमधील सर्वात कठीण प्रशासकीय सेवेत पहिल्यांदाच हिंदु महिलेची निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.