चंद्रपूर - जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. मूल तालुक्यातील तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या मजुराला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले ( Tiger killed Laborer In Chandrapur )आहे. मुल शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा भादूरना गावातील शेतमजूर खुशाल गोविंदा सोनूले ( वय ५४ ) हा १५ मे रोजी सकाळी तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेला होता. तेंदूपत्ता संकलन करुन जंगलातून गावाकडे परत येत असताना सोमनाथ परिसरातील जंगलात फिरत असलेल्या वाघाने त्याच्यावर सकाळी १०-०० वाजताच्या सुमारास हल्ला करुन त्याला ठार केले. ही घटना घडली शनिवारी होती.
मृतकाच्या नातेवाईकाला वनविभागाकडून मदत - गावातील खुशाल हे रात्र झाली तरी परत का आले नाही. याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली असता वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी काही गावकऱ्यांसोबत जंगलात जाऊन शोध घेतला. रात्र झाली, परंतु खुशालचा शोध काही लागला नाही. सोमवारी सकाळी परत वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आर.नायगमकर, क्षेत्र सहाय्यक पाकेवार, वनरक्षक वड्डे, पारडे, उईके, यांचे सोबत काही गावकरी जंगलात फिरुन शोध घेताना खुशालच्या मृतदेहाचे छिन्न विच्छिन्न अवस्थेत झालेले तुकडे सापडले. मृतक खुशाल सोनूले यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी लगेच घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलीस स्टेशन मुल यांना दिली असता पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांनी आपल्या सहकाऱ्याना घटनास्थळी पाठवून मोका चौकशी केली व मृतदेह मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविले. वनविभागाकडून मृतकांच्या नातेवाईकास तात्काळ २५,००० (पंचवीस हजार रुपये) आर्थिक मदत दिली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करीत आहेत. पाच महिन्यांपूर्वी मौजा कोसंबी येथे शेतात काम करीत असलेल्या महिलेवर देखील वाघाने हल्ला करुन ठार केले होते.
हेही वाचा - Indrani Mukherjee : कोण आहेत इंद्राणी मुखर्जी? ज्यांच्यावर शीना बोराच्या हत्येचा आहे आरोप