ETV Bharat / state

पाऊस पाडगा देवा.! पावसासाठी धाबा येथील गावकऱ्यांचे देवाला साकडे - pray

पावसाळ्याचा दूसरा महिना लोटत चालला असताना चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस बरसलेला नाही. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर एका पाराखाली असलेल्या देवाची पारंपरिक पूजा केली.

देवाकडे साकडे
author img

By

Published : Jul 29, 2019, 7:48 AM IST

चंद्रपूर- पावसाळ्याचा दुसरा महिना लोटत चालला असताना चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस बरसलेला नाही. परिणामी शेतातील कपाशी, भात पीक करपू लागले आहे. या अस्मानी संकटातून पिकांना वाचवण्यासाठी बळीराजाने पारंपरिक पद्धतीने देवाला साकडं घातले. देवाला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण गावाने वाजतगाजत देवाळात जाऊन पाऊस पडवा म्हणून प्रार्थना केली.

धाबा गावकऱ्यांचे देवाकडे साकडे

चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यात धाबा या गावी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी देवाची पूजा करण्यात आली. पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला, मात्र पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही पीक हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कसेबसे स्वतःला सावरत मोठ्या हिमतीने बळीराजाने शेती उभी केली. पावसाळ्यात दमदार पाऊस बरसणार, असे भाकित हवामान खात्याने वर्तवले होते. यामुळे मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र पावसाने दगा दिला. अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. शेतात पाण्याचा थेंबही साचलेला नाही. त्यात सूर्य आग ओकत आहे. यामुळे शेतातील कोवळी कपाशी, भाताचे पीक करपू लागले आहे.

या भीषण दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पाऊस पाडगा देवा..! अशी हाक देत अनेक गावात धार्मिक विधी केले जात आहेत. धाबा येथील गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करुन भिवसन देवाला साकडे घातले. यासाठी देवाला बोकडाचा बळी देण्यात आला. देवाची पूजा करण्यात आली. गावातील महिलांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन वाजतगाजत मिरवणूक काढली. गावाच्या वेशीवर एका पाराखाली असलेल्या देवाची पारंपरिक पूजा करण्यात आली.

पावसाचा अंदाज बांधण्यास विज्ञानाची गफलत होत असताना निदान देव तरी आपल्याला तारेल, ही भाबडी आशा इथल्या बळीराजाला आहे.

Intro:चंद्रपुर : पावसाळ्याचा दूसरा महिना लोटत चालला असताना चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस बरसलेला नाही.
परिणामी शेतातील कपाशी, भात पीक करपू लागले. या अस्मानी संकटातून वाचवण्यासाठी बळीराजानं पारंपरिक पद्धतीनं देवाला साकडं घातलं. देवाला प्रसन्न करण्यासाठी अक्ख गाव देवापाशी वाजतगाजत गेलं.Body:चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यात धाबा या गावी आज वेगळीच पूजा बघायला मिळाली. ही पूजा होती वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी. पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला, मात्र पावसाचा पत्ता नाही. त्यामुळं गतवर्षीप्रमाणं यंदाही पीक हातून जाण्याची भीषण स्थिती निर्माण झाली. कसंबसं स्वतःला सावरत मोठ्या हिमतीनं बळीराजानं शेती उभी केली. पावसाळ्यात दमदार पाऊस बरसणार, असं भाकित हवामान खात्याने वर्तवलं. यामुळं मोठ्या उत्साहानं शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र पावसानं दगा दिला. अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. शेतातील बांध्यात पाण्याचा थेंबही साचलेला नाही. त्यात सूर्य आग ओकत आहे. यामुळं शेतातील कोवळी कपाशी, भाताचे प-हे करपू लागलेत. या भीषण दुष्काळी परिस्थितून बाहेर काढण्यासाठी पाऊस पाडगा देवा...! अशी हाक देत अनेक गावात धार्मिक विधी केले जात आहेत. धाबा येथील गावक-यांनी लोकवर्गणी गोळा करुन भिवसन देवाला साकडं घातलं. यासाठी देवाला बोकडाचा बळी देण्यात आला. देवाची पूजा करण्यात आली. गावातील महिलांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन वाजतगाजत मिरवणूक काढली. गावाच्या वेशीवर एका पाराखाली असलेल्या देवाची पारंपरिक पूजा करण्यात आली.
पावसाचा अंदाज बांधण्यास विज्ञानाची गफलत होत असताना निदान देव तरी आपल्याला तारेल, ही भाबळी आस इथल्या बळीराजाला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.