चिमूर (चंद्रपूर) - येथील श्रीहरी बालाजी मंदिरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे हे मंदिर पुन्हा बंद करण्यात आले आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावरच मिळाली होती परवानगी -
राज्य शासनाच्या आदेशानंतर तब्बल 8 महिन्यानंतर कोरोनाच्या नियमांचे पालन करत राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु झाली. त्याचप्रमाणे चिमूरचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी मंदिर सुरू करण्यात आले. मात्र, मंदिरातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मंदिर बंद करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
हेही वाचा - राज्यासाठी पुढचे 15 दिवस धाकधुकीचे! टास्क फोर्सकडून कोरोना वाढण्याचा इशारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात सह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यानंतर हळूहळू अनलॉकच्या दिशेने पाऊले उचलण्यात आली. यानुसार देशातील अनेक गोष्टींना सुरू करण्यास हळूहळू परवानगी देण्यात आली. मात्र, प्रार्थनास्थळे बंदच होती. याबाबत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली. यानंतर अखेर राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. यानंतर दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली आहेत.
चिमूर येथील श्रीहरी बालाजी मंदिरही कोरोनाच्या नियमांचे पालन करत भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. मात्र, अवघ्या पाच दिवसांतच मंदिरातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.