ETV Bharat / state

अपक्षाचा पाठिंबा आणि भाजपचा आमदार यात फरक - मुनगंटीवार

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. त्यावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Nov 2, 2019, 9:42 AM IST

चंद्रपूर - विधानसभा प्रचारादरम्यान भाजपसह, सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रखर टीका करणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. जोरगेवार यांच्या भूमिकेवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अपक्ष म्हणून पाठिंबा देणे आणि भाजपचा अधिकृत उमेदवार निवडून येणे यात फरक असतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

जोरगेवारांच्या भूमिकेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

हेही वाचा - चर्चेसाठी आमची दारे खुलीच, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चर्चा होत नाही : मुनगंटीवार

प्रचारादरम्यान मुनगंटीवारांविरोधात जोरगेवार यांनी केलेली जहरी टीका आणि त्यांच्यातील ताणलेले संबंध बघता मुनगंटीवार यांनी यावर पहिल्यांदाच केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रचारादरम्यान भाजप आणि विशेषतः सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रखर टीका केली होती. त्यांनी जिल्ह्यात केलेली दारूबंदी, विकास कामे, बेरोजगारी, प्रशासनाचा गैरवापर यावर गंभीर आरोप केले होते. एवढेच नव्हे तर निवडून आलो तरी आपण कधीही भाजपमध्ये जाणार नाही किंवा पाठिंबाही देणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती. तर दुसरीकडे मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथून भाजपचे नाना श्यामकुळे यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते.

मुनगंटीवार यांना आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ते गरजेचेही होते. मात्र, जोरगेवार यांना निवडून आणण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छुपे पाठबळ होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मतदानापूर्वी १६ ऑक्टोबरला जोरगेवार यांची मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार बंटी भांगडीया यांच्याशी गुप्त भेट झाली होती, अशी विश्वसनीय माहिती आहे. तसेच भांगडीया आणि मुनगंटीवार यांच्यात फारसे सख्य नाही.

हेही वाचा - परतीच्या पावसाचा ३२५ तालुक्यांना फटका, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश - मुख्यमंत्री

जोरगेवार यांना निवडून आणून मुनगंटीवार यांचे वर्चस्व कमी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव होता, अशीही चर्चा होती. याच दरम्यान निवडून आल्याच्या दोन दिवसांतच जोरगेवार यांनी बंटी भांगडीया यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत बिनशर्त पाठिंबा दिला. यावर मुनगंटीवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांना जोरगेवार यांनी दिलेल्या पाठिंब्याचे स्वागतच मात्र, अपक्ष म्हणून पाठिंबा देणे आणि भाजपचा अधिकृत आमदार निवडून येणे यात फरक असतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. यावरून आमदार जोरगेवार यांनी दिलेल्या पाठिंब्यापेक्षा भाजपचे श्यामकुळे यांचा पराभव झाल्याची खंत मुनगंटीवार यांना असल्याचे दिसून येत आहे.

Intro:चंद्रपूर : प्रचारादरम्यान भाजपसह, सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रखर टीका करणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला बिनशर्त पाठिंबा दर्शविला. जोरगेवार यांच्या भूमिकेवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अपक्ष म्हणून पाठिंबा देणे आणि भाजपचा अधिकृत उमेदवार निवडून येणे यात फरक असतो असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. प्रचारादरम्यान मुनगंटीवारांविरोधात जोरगेवार यांनी केलेली जहरी टीका आणि त्यांच्यातील ताणलेले संबंध बघता मुनगंटीवार यांनी यावर पहिल्यांदाच केलेले सूचक भाष्य याची राजकिय वर्तुळात आता चर्चा होत आहे.

Body:प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रचारादरम्यान भाजप आणि विशेषतः सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रखर टीका केली होती. त्यांनी जिल्ह्यात केलेली दारूबंदी, झालेला विकास, बेरोजगारी, प्रशासनाचा केलेला वापर यावर त्यांनी गंभीर आरोप केले होते. एवढेच नव्हे तर निवडून आलो तरी आपण कधीही भाजपमध्ये जाणार नाही किंवा पाठिंबाही देणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली होती. तर दुसरीकडे मुनगंटीवार हानी चंद्रपूर येथून भाजपचे नाना श्यामकुळे यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मुनगंटीवार यांना आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ते गरजेचेही होते. मात्र, जोरगेवार यांना निवडून आणण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छुपे पाठबळ होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मतदानापूर्वी 16 ऑक्टोबरला जोरगेवार यांची मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार बंटी भांगडीया यांची गुप्त भेट झाली होती अशी विश्वसनीय माहिती आहे. भांगडीया आणि मुनगंटीवार यांच्यात फारसे सौख्य नाही. जोरगेवार यांना निवडून आणून मुनगंटीवार यांचे वर्चस्व कमी करण्याचा मुख्यमंत्री यांचा डाव होता अशीही चर्चा होती. याच दरम्यान निवडून आल्याच्या दोन दिवसांतच जोरगेवार यांनी बंटी भांगडीया यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत बिनशर्त पाठिंबा दिला. यावर मुनगंटीवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांना जोरगेवार यांनी दिलेल्या पाठिंब्याचे स्वागतच मात्र, अपक्ष म्हणून पाठिंबा देणे आणि भाजपचा अधिकृत आमदार निवडून येणे यात फरक असतो असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. यावरून आमदार जोरगेवार यांनी दिलेल्या पाठिंब्यापेक्षा भाजपचे श्यामकुळे यांचा पराभव झाल्याची खंत मुनगंटीवार यांना असल्याचे दिसून येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.