चंद्रपूर : जगभरात सर्वाधिक वाघांची संख्या ज्या जंगलात आहे त्या ताडोबा अभयारण्यात नेहमीच वनविभागाला विविध प्रकारची काळजी घ्यावी लागत असते. सध्या उन्हाळा सुरू होत आहे. या कडाक्याच्या उन्हाळ्यात जंगलाला आग लागण्याचे प्रकार सुद्धा घडत असतात. याकडे लक्ष ठेवायची जबाबदारी वनरक्षकांच्याच खांद्यावर असते. अशाचत एका महिला वनरक्षकाने आपल्या बिटमध्ये कुठे आग लागली असेल तर लगेच समजावी यासाठी उंच झाडावर मजुरांकडून एक सुंदर मचान बनवून घेतले आहे. प्रिया ब्राम्हणकर असे या महिला वनरक्षकाचे नाव आहे. शिवाय अवघड असलेल्या मचान वर स्वतः जाऊन देखरेख सुद्धा करताना त्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यांच्या या मचानचा व्हिडिओ नक्की पाहा
वनरक्षक गरजेनुसार बनवतात मचान : वनरक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात आपल्या गरजेनुसार मचान बनवत असतात. उन्हाळ्यात आगीच्या मोठया प्रमाणात घटना घडण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे वनविभागाला नेहमी विशेष काळजी घ्यावी लागत असते. त्यासाठी उन्हाळ्याच्या पूर्वी सर्वच कामांना सुरुवात होत असते. सर्वच वन कर्मचारी आपापल्या परिसरात देखरेख ठेवत असतात. मात्र घनदाट जंगलात सुद्धा आगीच्या घटना घडत असतात. मुख्य मार्गापासून आतमध्ये आग लागली असेल तर कधी कधी मोठी आग लागेपर्यंत लक्षात येत नाही. त्यामुळेच आशा वेळी या मचानचा उपयोग चांगल्या पद्धतीने देखरेखीसाठी होऊ शकतो. थोडा धूर जरी कोठून दिसू लागला तर, मोठी आग लागू नये यासाठी आधीच तिथपर्यंत पोहचून आगीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. म्हणूनच तशा पद्धतीचे मचान आगरझरी येथील वनरक्षण प्रिया ब्राम्हणकर यांनी आपल्या वनमजुरांसोबत स्वतः बनवून घेतले आहे. येथील एका उंच झाडावर हे मचान बनविले असून पूर्णपणे जंगलातीलच बांबू आणि इतर गोष्टींपासून बनवले आहे. त्यावरून आता आजूबाजूला दूरवरचा परिसर दिसू शकत आहे.
आगीच्या घटनांची नोंद : यापूर्वी सुद्धा आगीच्या घटना घडल्या आहेत. शिवाय याला गावकरी सुद्धा जबाबदार ठरले असल्याच्या नोंद आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा त्या त्या वेळी वनविभागाकडून सूचना दिल्या गेल्या आहेत. कोणत्याही प्रकारे जंगल परिसरात आगीबाबत निष्काळजीपणा करू नये आशा सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. जंगल परिसरात आग लागू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी गावकऱ्यांनी बैठक घ्यावी, नियम बनविणे तसेच शेतातील कचरा किंव्हा कोणत्याही जर, पेटवत असाल तर तो शेती सोडून इतरत्र न जाता तिथेच विझवणे, शिवाय वनविभागाला याबाबत माहिती देऊन त्यांची सुद्धा मदत घेणे, मोठी आग लागली तर तात्काळ वनविभागाला कळविणे तसेच वनविभागाला त्या त्या वेळी शक्य ती सर्व मदत करणे. आदी गोष्टींबाबत वनविभागाकडून वारंवार नागरिकांना सूचित करण्यात येते.
हेही वाचा - MLC Seats Row : विधान परिषदेतील बारा आमदारांचा घोळ सुटेना; शिंदे, फडणवीस यांच्यात मतभेद?