ETV Bharat / state

Woman sold abroad : नोकरीचे आमिष देऊन महिलेची परराज्यात विक्री; तिघांना अटक - पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचा फायदा

नोकरी लावून देण्याची फुस लावून एका महिलेची परराज्यात विक्री करण्यात आल्याची ( woman was sold abroad ) धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचा फायदा घेत, तिला हे आमिष दाखविण्यात आलं होतं.

Woman sold abroad
महिलेची परराज्यात विक्री
author img

By

Published : Oct 19, 2022, 8:18 AM IST

चंद्रपूर : नोकरी लावून देण्याची फुस लावून एका महिलेची परराज्यात विक्री करण्यात आल्याची ( woman was sold abroad ) धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचा फायदा ( Benefit of woman is separated from her husband ) घेत, तिला हे आमिष दाखविण्यात आले होते. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी राजुरा येथील एका महिलेसह इतर दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

अशी केली फसवणूक : राजुरा येथील रमाबाई वार्डातील आशाबाई कवडू रामटेके उर्फ माधुरी माणिकराव वाघमारे हिने आपल्या जुन्या संबंधातून ओळख झालेल्या पीडित महिलेला नागपूर येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले हेाते. पीडित महिलेचे आपल्या पतीसोबत पटत नसल्याने ती बल्लारपूर येथे एक महिन्यापूर्वी आपल्या नातेवाईकाकडे राहण्यास आली. तिथून काही दिवसांनी ती विसापूर येथिल दुसऱ्या नातेवाईकाकडे गेली असताना तिच्या शेजारी राहणारी आशाबाई वाघमारे हिच्याशी ओळख झाली. तिने पीडितेला नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने बल्लारपूर येथे भेटायला बोलाविले व नागपूर येथे नोकरी लावून देतो असे म्हणून नागपूर नेण्याच्या बहाण्याने थेट उज्जैन येथे घेऊन गेली. तिथे प्रेम नावाच्या व्यक्तीने मदन अंबाराम राठी वय ४० कडून १ लाख रुपये घेऊन पीडिते सोबत लग्न लावून दिले.

बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार : आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलेल्या पीडितेला संधी साधून राजुरा येथे राहणारी मावशीला फोन करून घडलेला घटनेबाबत माहिती दिली. आपल्याला एक लाख रुपयाला विकले असुन त्यांनी आपल्याला घरात कोंडून ठेवल्याचे सांगितले. यावरून पीडितेचा भाऊ आकाश मनोहर पाझारे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनत पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन गाठून आरोपी मदन अंबादास राठी, केसरा बाई मंथन, अशाबाई कवडू रामटेके यांना अटक केली. न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.