चंद्रपूर - कोळसा खाणीतून थेट वीज केंद्रात पाईप कन्व्हेयरच्या सहाय्याने कोळशाची वाहतूक करणारी आधुनिक यंत्रणा उभारल्याने आता चंद्रपूर वीज केंद्राला कोळसा उपलब्धतेत मोठी सुविधा होणार आहे. महानिर्मितीने वेकोलीच्या भटाळी खुल्या कोळसा खाणीत ही यंत्रणा स्थापित केली असून त्याचा लोकार्पण समारंभ शनिवार 13 नोव्हेंबर रोजी दुपारी होणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.
सदर समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, विशेष अतिथी म्हणून खासदार बाळू धानोरकर, आमदार सर्वश्री नागोराव गाणार, डॉ. रामदास आंबटकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार तर सन्माननीय अतिथी म्हणून प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ. मिताली सेठी आणि वेकोलिचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
13 नोव्हेंबरला कोळसा पाईप कन्व्हेयरचे लोकार्पण; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार उद्घाटन - Chandrapur coal news
कोळसा खाणीतून थेट वीज केंद्रात ‘पाईप कन्व्हेयर’च्या सहाय्याने कोळश्याची वाहतूक करणारी आधुनिक यंत्रणा उभारल्याने आता चंद्रपूर वीज केंद्राला कोळसा उपलब्धतेत मोठी सुविधा होणार आहे.