चंद्रपूर - जिल्हाधिकारी डॉ. कुणाला खेमणार यांनी जिल्हयातील योजनांचा आढावा बैठक नियोजीत केली होती. या बैठकेला 'मॅरेथॉन' असे शिर्षक देण्यात आले होते. तब्बल चार तास चाललेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी विविध विभागातील योजनांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा गुरुवारी आयोजीत करण्यात आली होती. ही बैठक सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली. या बैठकीमध्ये सर्वप्रथम जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना, क्षेत्राबाहेरील योजना, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या व निधी वितरण केलेल्या कामांची सद्यस्थिती व पूर्ण-अपूर्ण प्रस्तावांबाबत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा - शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांसाठी विठ्ठलाला साकडे, दाम्पत्याने केली अनवाणी पायी वारी
याशिवाय जिल्हा वार्षिक योजना 2019 - 20 अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी झालेल्या प्रत्यक्ष खर्चाबाबत सविस्तर माहिती आणि ऑक्टोबर 2019 चा प्रगती मासिक अहवाल देखील विविध विभागांनी सादर केला. या बैठकिला विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
हेही वाचा - सध्याची राजकीय अस्थिरता परवडणार नाही, प्रमुख पक्षांनी सरकार स्थापन करावे - संभाजीराजे
नोव्हेंबर महिन्यामध्ये आतापर्यंत वितरीत करण्यात आलेल्या निधीपैकी किती निधी खर्च करण्यात आला. याबद्दलचा आढावा घेताना त्यांनी दुर्लक्ष करणाऱ्या विभागांना तातडीने गतिशील होण्याचे निर्देश दिले. यावेळी काही विभागांनी दुर्लक्ष केल्याचे पुढे आल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसाही बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आरोग्य, पेयजल, शिक्षण, कौशल्य विकास व जिल्ह्यात सुरू असणाऱ्या विविध योजनांना पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच नाविन्य योजनेतून या वर्षभरात करण्यात आलेल्या कामाचा आढावा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. तसेच निधीचा वापर कल्पकतेने करण्याबाबतचे निर्देश दिले.