ETV Bharat / state

विदेशात शिक्षण घेणारे ते ग्रामपंचायत सदस्य, डॉ. कल्याणकुमार यांचा आदर्श प्रवास

चंद्रपूर मधील चितेगाव ग्रामपंचायतीमध्ये कल्याणकुमार नयन यांना निवडणूकीत विजय मिळाला आहे. त्यांचा विदेशात शिक्षण ते ग्रामपंचायत सदस्य असा आदर्श प्रवास आहे.

He is a Gram Panchayat member studying abroad. Kalyankumar's ideal journey
विदेशात शिक्षण घेणारे ते ग्रामपंचायत सदस्य, डॉ. कल्याणकुमार यांचा आदर्श प्रवास
author img

By

Published : Jan 18, 2021, 9:48 PM IST

Updated : Jan 18, 2021, 10:08 PM IST

चंद्रपूर - राजकारणात उच्च शिक्षित लोकांनी यावं असा एक मतप्रवाह आहे. मात्र, असे चित्र क्वचितच दिसून येते. मात्र, या अपेक्षेला सार्थ करून दाखवले ते कल्याणकुमार नयन यांनी. दिल्लीच्या जेएनयूचे विद्यार्थी, विदेशात उच्च शिक्षण, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आणि आता ते चितेगाव ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य ठरले आहेत. त्यांच्या या प्रवासाने राजकारणातील अपेक्षेला एक वेगळी दिशा मिळाली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे ते पती आहेत.

विदेशात शिक्षण घेणारे ते ग्रामपंचायत सदस्य, डॉ. कल्याणकुमार यांचा आदर्श प्रवास

डॉ. कल्याण कुमार यांनी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय जवाहरलाला नेहरू विद्यापीठातून पीएचडी पदवी घेतली आहे. दिल्लीच्या एका नामांकित महाविद्यालयात ते सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. यानंतर अमेरिकेतील येल विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली. निष्णात वकील म्हणून त्यांचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेविका अॅड पारोमिता गोस्वामी यांच्याशी विवाह केल्यानंतर ते चंद्रपूर जिल्ह्यात समाजकार्यात सहभागी झाले. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या डॉक्टर कल्याण कुमार यांनी चंद्रपूरमध्ये आल्यानंतर मराठी भाषा अवगत केली. भारतासह जगभरातील इतिहासावर त्यांचे प्रभुत्व आहे. एल्गार प्रतिष्ठान आणि श्रमिक एल्गारच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. कामगार आणि आदिवासींवर होणाऱ्या अन्याय संदर्भात ते याचिकांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम त्यांनी केले जे कार्य अद्यापही सुरू आहे.

इतके मोठे प्रस्थ असताना देखील त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. देशातील संसदीय लोकशाहीचा पाया म्हणून ग्रामपंचायतीचा उल्लेख होतो. त्यामुळे विकासाची खरी सुरुवात इथून व्हायला हवी हा त्यामागचा विचार. सकारात्मक विचार आणि परिवर्तनाचे ध्येय घेऊन ते राजकारणात उतरले. मूल तालुक्यातील चितेगाव येथील ग्रामपंचायतीचे ते मतदार आहेत. गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. अविरोध निवडून देण्यासाठीही प्रयत्न झाले. मात्र, ऐन वेळी राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून निवडणूक लढविण्यासाठी काही विरोधी उमेदवारांना रिंगणात उतरवले आणि निवडणूक पार पडली. या निवडणुकीत डॉ. कल्याणकुमार वार्ड नंबर 1 मधून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आणि विजयी झाले. त्यांचा राजकारणात उतरण्याचा मानस आणि त्यात पहिल्या प्रयत्नात मिळालेले यश यामुळे त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Last Updated : Jan 18, 2021, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.