राजूरा (चंद्रपूर) - गोंडपिपरी पंचायत समिती प्रशासनात कोरोनाबाधित रुग्ण निघाले. सोबतच नगरातील काहींना लागण झाली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी गोंडपिपरी शहरात उद्या दिनांक 16 आॅगष्ट पासून चार दिवस कडकडीत बंदचा आदेश निर्गमीत केला आहे. याचसोबत 20 व 21 आॅगष्टला जीवनावश्यक अंतर्गत मोडणाऱ्या सेवा सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत.
गोंडपिपरीत सहा कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कामाला लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे, तहसीलदार सिमा गजभिये, ठाणेदार संदीप धोबे यांनी केले आहे. घराबाहेर पडल्यास दंडात्मक तथा फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याने येणारे चार दिवस नागरिकांनी आपआपल्या घरीच राहावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उद्यापासून गोंडपिपरी चार दिवस बंद
गोंडपिपरीत सहा कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कामाला लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.