ETV Bharat / state

गोंडपिपरी तालुक्यातील शेती वन्यजीवांच्या हैदोसामुळे संकटात, शेतकरी चिंतेत - गोंडपिपरी शेती

गोंडपिपरी तालुक्यातील शेतात लावलेल्या पिकांवर वन्यजीव तुटून पडल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. ही बहरलेली पीकं भुईसपाट होत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतीचे नुकसान
author img

By

Published : Oct 7, 2019, 2:14 PM IST

चंद्रपुर - जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील शेती वन्यजीवांच्या हैदोसामुळे संकटात सापडली आहे. कपाशीचे बोंड रानडुकरे मोठ्या प्रमाणात फस्त करत असल्याने शेकडो झाडे भुईसपाट होत आहेत. या प्रकाराने बळीराजाचे मोठे नुकसान होत आहे. तर, शेतात वन्यजीवांचा वावर असल्याने शेतकरी शेतात जायला दचकत आहेत.

वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतीचे नुकसान

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका हा वनव्याप्त आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेती जंगलालगत असल्याने वन्यजीवांकडून शेतमालाचे अतोनात नुकसान होत असते. या तालुक्यात गेल्या वर्षाचा तुलनेत यावर्षी कपाशीचे पीक चांगले झाले. मात्र, बहरलेल्या कपाशीसमोर आता वन्यजीवांचे संकट उभे असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

हेही वाचा - हिराईनगरवासी निर्णयावर ठाम; निवडणुकीवर टाकणार बहिष्कार

बोंडावर आलेल्या कपाशीच्या शेतात रानडुकरे तुटून पडली आहेत. रानडुकरांनी खाल्लेल्या कपाशीच्या बोंडांचा सडा शेतात विखुरला असतानाच शेकडो झाडेही भुईसफाट झाली आहे. यामुळे चांगले बहरलेले पिक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होताना बघण्याची वेळ बळीराजावर ओढावली आहे. तर, वन्यजीवांकडून हजारो रुपयांच्या शेतपिकाचे नुकसान झालेले असताना वनविभागाकडून मिळणारी मदत तोकडी असल्याने शेतकरी संतप्त आहे. विशेष बाब म्हणजे वन्यजीवांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी नानाविध उपाययोजना अमलात आणत असतो. तसेच यासाठी हजारो रुपयांची उपकरणे शेतात लावली जातात. मात्र, अद्यापही वन्यजीवांना शेतापासून दूर ठेवण्यात शेतकऱ्याला यश आले नसून पिंकाचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

हेही वाचा - होय आम्ही भाजपचेच, मग आमची कामे का होत नाहीत? कार्यकर्त्याचा आमदारांना प्रश्न

Intro:शेतात वन्यजीवांचा हैदोस , बळीराजा संकटात

चंद्रपुर

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यातील शेती वन्यजीवांचा हैदोसामुळे संकटात सापडली आहे. कपाशीचे बोंड रानडुकरे मोठ्या प्रमाणात फस्त करित असतांना शेकडो झाडे भुईसपाट होत आहेत. याप्रकाराने बळीराजाचे मोठे नुकसान होत असून शेतात वन्यजीवांचा आवास असल्याने शेतात जायला शेतकरी दचकत आहेत.

गोंडपिपरी तालूका वनव्याप्त आहे. तालूक्यातील बहूतांश शेती जंगलालगत असल्याने वन्यजीवांकडून शेतमालाचे अतोनात नुकसान होत असते. तालूक्यात मागील वर्षाचा तूलनेत यावर्षी कपाशीचे पिक चांगले जमून आले. मात्र बहरलेल्या कपाशीसमोर आता वन्यजीवांचे संकट उभे आहे.बोंडावर आलेल्या कपाशीचा शेतात रानडुकरे तूटून पडली आहेत. रानडुकरांनी खालेल्या कपाशीचा बोंडाचा सडा शेताशेतात विखुरला असतांनाच शेकडो झाडे भुईसफाट झाल्याचे विदारक चित्र बघायला मिळतं आहे. चांगले बहरलेले पिक डोळ्यादेखत उध्वस्त होतांना बघण्याची वेळ बळीराजावर ओढावली आहे. वन्यजीवांकडून हजारो रुपयाचा शेतपिकाचे नुकसान झालेले असतांना वनविभागाकडुन मिळणारी मदत तोकडी असल्याने बळीराजा संतप्त आहे. विशेष बाब म्हणजे वन्यजीवांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी बळीराजा नानाविध उपाययोजना अमलात आणित असतो. यासाठी हजारो रुपयाचे उपकरणे शेतात लावलेले जातात.
मात्र अद्यापही वन्यजीवांना शेतापासून दूर ठेवण्यात बळीराजाला यश आले नाही.Body:बाईट
राजेश गोहणे, शेतकरी धाबाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.