ETV Bharat / state

'महिनाभर काम नाही तर पगार कशाचा!', महिला विस्तार अधिकाऱ्याने दिला संपूर्ण पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत - lockdown in india

एप्रिल महिन्यात आपण कार्यालयातच गेले नाही तर हा पगार तरी आपण का घ्यावा, असा प्रश्न त्यांना पडला. या रकमेतून राज्य शासनाच्या माध्यमातून गरजवंतांना मदत होईल या भावनेने त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांचे पती डॉ. विनोद रामटेके यांनी देखील त्यांच्या या निर्णयाला आनंदाने पाठिंबा दिला. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे आपला एप्रिल महिन्याचा पगार 55 हजार 453 रुपये इतका धनादेश त्यांनी सुपूर्द केला. त्यांच्या या निर्णयाचे जिल्हाधिकाऱ्यांनीही कौतुक केले.

महिला विस्तार अधिकाऱ्याने दिला संपूर्ण पगार मुख्यमंत्री सहायता निधीत

author img

By

Published : May 15, 2020, 4:41 PM IST

Updated : May 15, 2020, 8:59 PM IST

चंद्रपूर - देशात कोरोनाने थैमान घातले आणि बघता बघता संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये गेला. यात काही शासकीय कार्यालये पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही घरीच बसावे लागले. मात्र, यावेळीही त्यांचा पूर्ण पगार निघाला. मात्र, महिनाभर कुठलेच काम केले नाही. तर वेतन तरी कसे घ्यायचे, असे एका स्वाभिमानी महिला विस्तार अधिकाऱ्याला वाटले आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला साद देत आपले संपूर्ण वेतनच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले. प्रीती शंकर वेल्हेकर असे या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत कार्यरत आहेत. तब्बल 55 हजार 453 रुपयांचा धनादेश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे सुपूर्द केला.

महिला विस्तार अधिकाऱ्याने दिला संपूर्ण पगार मुख्यमंत्री सहायता निधीत

प्रीती वेल्हेकर या जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी दहा वर्षापासून कार्यरत आहेत. सध्या त्यांच्याकडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची जबाबदारी आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाने देशात हातपाय पसरायला सुरुवात केली. याचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून सरकारलाही ऐतिहासिक पाऊले उचलावी लागली. यामुळे पहिल्यांदाच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली. एप्रिलच्या संपूर्ण महिन्यात ही कार्यालये बंद होती. राज्य शासनाची महसुलाची दारे पूर्णपणे बंद असतानाही एप्रिल महिन्याचा पूर्ण पगार संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा झाला. तर दुसरीकडे कोरोनाला राज्यात हरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले होते. यासाठी आर्थिक सक्षम लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले होते. अनेकांनी यासाठी खारीचा वाटा उचलला. मात्र, यासाठी विस्तार अधिकारी प्रीती वेल्हेकर यांनी आपला संपूर्ण पगारच मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात आलेला धनादेश.

एप्रिल महिन्यात आपण कार्यालयातच गेले नाही तर हा पगार तरी आपण का घ्यावा, असा प्रश्न त्यांना पडला. या रकमेतून राज्य शासनाच्या माध्यमातून गरजवंतांना मदत होईल ह्या भावनेने त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांचे पती डॉ. विनोद रामटेके यांनी देखील त्यांच्या या निर्णयाला आनंदाने पाठिंबा दिला. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे आपला एप्रिल महिन्याचा पगार 55 हजार 453 रुपये इतका धनादेश त्यांनी सुपूर्द केला. हा निर्णय बघून जिल्हाधिकारी यांनी देखील वेल्हेकर यांचे भरभरून कौतुक केले. कोरोनाची महामारी दिवसेंदिवस रुद्र रूप धारण करत असताना या महिला विस्तार अधिकाऱ्यांनी केलेली भरीव मदत ही कौतुकास पात्र ठरली आहे.

Last Updated : May 15, 2020, 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.