ETV Bharat / state

कृपया सरकारने सांगितलेले नियम पाळा! जर्मनीस्थित चंद्रपूरच्या तरुणाचा भारतीयांना संदेश - कोरोनामुळे घरी थांबा

कोरोना व्हायरसने जगातील अनेक देशांना आपल्या कवेत घेतले आहे. संपुर्ण जग आता कोरोनापासून बचावासाठी काय करता येईल, याच्या शोधात आहे. भारतातील अनेक नागरिक सध्या परदेशात असून ते देखील कोरोनाच्या दहशतीखाली आहे तो.

कौस्तुभ गौरकार गोंडपिंपरी चंद्रपूर जर्मनी
कौस्तुभ गौरकार
author img

By

Published : Mar 28, 2020, 3:19 PM IST

चंद्रपूर - जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच देशात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे 'कोरोनासंदर्भात जनजागृती व लॉकडाऊनची अंमलबजावणी हा एकच पर्याय आपल्याकडे शिल्लक आहे. लोकांनी कृपया सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे, अशी भावना मुळच्या गोंडपिंपरी येथील मात्र सध्या जर्मनीत असलेल्या कौस्तुभ गौरकार या तरुणाने व्यक्त केली आहे.

जर्मनीत असलेल्या कौस्तुभ गौरकार याचा भारतीयांना संदेश.. घरी राहूनच बना हिरो!

हेही वाचा... Video : कोरोनापासून भयभीत आहात?, ब्राव्होचं प्रेरणादायी गाणं पाहा

जर्मनीतही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे तिथही लॉकडाऊन करण्यात आले आहे. कौस्तुभ जिथे आहे, तेथील त्याची कंपनीही बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे तो वुल्सबर्ग शहरातील आपल्या घरात सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. भारतात कोरोनाची स्थिती लक्षात घेता त्याने देशवासियांना आपल्या घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. स्वतःची, कुटुंबियांची सुरक्षा महत्वाची आहे. यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करताना त्याने नागरिकांना आपल्या घरी राहूनच हिरो बना, असा संदेश व्हिडिओद्वारे दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.