ETV Bharat / state

वाघांच्या वावराने जोगापूरची यात्रा स्थगित; भक्तांना फक्त देवदर्शनाची मुभा

जोगापूरला देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना दररोज वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, कोणतेही अनुचित प्रकार टाळण्यासाठी भक्तांना वनपरिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

chandrapur jogapur pilgrimage news
वाघांच्या वावराने जोगापूरची यात्रा स्थगित
author img

By

Published : Dec 12, 2019, 4:43 PM IST

चंद्रपूर - जोगापूरला देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना दररोज वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, कोणतेही अनुचित प्रकार टाळण्यासाठी भक्तांना वनपरिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच फक्त दर्शनासाठी परवानगी देण्यात आली असून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

वाघांच्या वावराने जोगापूरची यात्रा स्थगित

राजुरा तालुक्यातील जोगापूर-रिठ वनक्षेत्रात येणाऱ्या हनुमान देवस्थान येथे मार्गशीर्ष महिन्यात मोठा यात्रा महोत्सव असतो. हे देवस्थान निसर्गरम्य असल्याने या ठिकाणी भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र, वनक्षेत्रात काही दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून यात्रा बंद केली आहे. काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाले होते.

हेही वाचा - परभणीच्या सेलू तालुक्यात दिसला वाघ.. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

सध्या या जंगलात 4 वाघांचे वास्तव्य असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने यात्रा महोत्सवाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दर्शनाला जाण्यासाठी चारचाकी वाहने बंधनकारक आहेत.

Intro:देव दर्शनाला ,वाघोबा सोबतीला;वाघांच्या दर्शनाने भक्त सूखावले;जोगापूर झाले दूसरा ताडोबा

चंद्रपूर

देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना वाघोबाचे नित्यनेमाणे दर्शन होत आहे. वाघोबाला बघून भक्तांचा आनंद ओसंडून वाहत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जोगापूर दूसरे ताडोबा ठरतं आहे. मात्र मानव-वाघ संघर्ष टाळण्यासाठी जोगापूर यात्रा स्थगित करण्यात आली आहे. केवळ देव दर्शनाची मुभा प्रशाशनाने दिली आहे. याप्रकाराने भक्तामध्ये नाराजी दिसून येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील जोगापूर रिठ वनक्षेत्रात येणाऱ्या हनुमान देवस्थान येथे मार्गशिष महिन्यात मोठी यात्रा महोत्सव असते. रमणीय स्थळ असल्याने दर्शनासाठी जिल्हातील भक्त मोठ्या संख्येने जोगापूरला येत असतात .
मात्र या वनक्षेत्रात काही महीण्यापासून वाघाचा धुमाकूळ सूरु आहे.या वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एकाच मृत्यू तर दुसऱ्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. सध्या या जंगलात 4 वाघाचे वास्तव्य असल्याचे वनविभागाचे म्हणने आहे. अश्यात यात्रा महोत्सव दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून यात्रा महोत्सवाला स्थगिती देण्याचा निर्णय प्रशाशनाने घेतला आहे. जोगापूर मंदीर गाठण्यासाठी केवळ कार,सुमो,आणि बसने प्रवास करण्याची सक्ती वनविभागाने लादली आहे.या निर्णयामुळे सामान्य भक्त मंडळीत नाराजी व्यक्त होत आहे.
जोगापूरला गाठण्यासाठी राजुरा हा मार्ग सुरु असून या मार्गाने काही भक्त खाजगी वाहनाने जात आहेत. या पैकी काही लोकांना दररोज वाघाचं दर्शन होत आहे. त्यामुळे यात्रा बंद असली तरी वाघाचे दर्शनाने ताडोबाच्या जंगलात आल्याचा भास भक्तांना होतो आहे. वाघाच्या दर्शनाने आनंद मिळत असल्याचा प्रतिक्रिया भक्त व्यक्त करित आहेत.Body:विडीओ बाईट
संतोष कुंदोजवार भक्त
विकास शिंदे,वनपालConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.