ETV Bharat / state

ब्रायन लारा म्हणतो, ताडोबा म्हणजे आनंदाची पर्वणीच! - ब्रायन लारा

लारा याला विश्रांतीसाठी ताडोबा अभयारण्यात जाण्याचे प्रसिद्ध गोलंदाज अनिल कुंबळे याने सुचविले. अनिल कुंबळे यापूर्वी येथे आला होता. ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे सौंदर्य आणि जैवविविधता पाहून तो भारावून गेला होता.

ब्रायन लारा
author img

By

Published : Jun 13, 2019, 6:42 AM IST

चंद्रपूर - ताडोबाच्या निसर्गसौंदर्य आणि जंगल सफारीची भुरळ माजी क्रिकेटपटू ब्रायन लारालाही पडली आहे. ताडोबातील अनुभव हा आनंदाची पर्वणी असल्याचे त्याने ट्विट केले आहे. ब्रायन लारा हा ताडोबाचा वाघ पाहण्यासाठी मंगळवारपासून ठाण मांडून आहे.

"दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी चक्क ४५ डिग्री अंश सेल्सियस तापमानात भारताच्या मध्यभागी (ताडोबा व्याघ्रप्रकल्प) जायचे ठरवले. मात्र, ताडोबा अभयारण्य म्हणजे आनंदाची पर्वणीच." या शब्दात माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याने ताडोबातील अनुभव ट्विटरवर केला आहे.

ब्रायन लारा हा स्वसरा रिसॉर्ट येथे थांबला आहे. त्याने बुधवारी सकाळी जंगल सफारीचा आनंद लुटला. यावेळी त्याला वाघाचे आणि सांबराचे दर्शन झाले. हे दृश्य त्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केल आहे. लारा याला विश्रांतीसाठी ताडोबा अभयारण्यात जाण्याचे प्रसिद्ध गोलंदाज अनिल कुंबळे याने सुचविले. अनिल कुंबळे यापूर्वी येथे आला होता. ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे सौंदर्य आणि जैवविविधता पाहून तो भारावून गेला होता.

Brain Lara tweet
ब्रायन लाराचे ट्विट

ब्रायन लारा याचेही असेच काहीसे झाले आहे. लाराने बुधवारी सकाळी आपल्या कुटुंबीयांसह जंगल सफारीचा आनंद लुटला. यादरम्यान कैद केलेले चार फोटो ब्रायनने ट्विटरवर शेअर केले आहेत. एकूणच ताडोबाचे सौंदर्य पाहून लारा खूश झाल्याचे ट्विटमधून दिसून येत आहे. लारा आज सकाळी पुन्हा जंगल सफारी करणार आहे.

Intro:चंद्रपुर : "दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी चक्क 45 डिग्रीच्या तापमानात भारताच्या मध्यभागी (ताडोबा व्याघ्रप्रकल्प) जायचं ठरवलं. मात्र, ताडोबा अभयारण्य म्हणजे आनंदाची पर्वणीच." या शब्दांत क्रिकेटचा लेजेन्ड ब्रायन लारा याने आपल्या भावना ट्विट केल्या आहेत. Body:कालपासून ब्रायन लारा हा तोडब्याचा वाघ बघण्यासाठी ठाण मांडून आहे. स्वसरा रिसॉर्ट येथे तो थांबला असून आज सकाळी त्याने जंगल सफारीचा आनंद लुटला. यावेळी त्याला वाघाचे आणि संबराचे दर्शन झाले जे त्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेत. लारा याला विश्रांतीसाठी ताडोबा अभयारण्यात जाण्याचे प्रसिद्ध गोलंदाज अनिल कुंबळे याने सुचविले. तो यापूर्वी येथे आला असून त्याने ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे सौंदर्य आणि जैवविविधता पाहून तोही भारावून गेला होता. ब्रायन लारा याचेही असेच काहीसे झाले. कालपासून तो ताडोब्यात आहे. आज सकाळी त्याने आपल्या कुटुंबीयांसह जंगल सफारीचा आनंद लुटला. यादरम्यान कैद केलेले चार फोटो ब्रायनने आपल्या ट्विटमध्ये शेअर केले आहेत. एकूणच ताडोब्याचे सौंदर्य पाहून ब्रायन देखील हुरळून गेला असेच या ट्विटमधून दिसून येत आहे. उद्या सकाळी तो पुन्हा जंगल सफारी करणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.