चंद्रपूर - एका तरुणीचा धडावेगळा मृतदेह नग्नावस्थेत भद्रावती जवळ एका निर्जन ठिकाणी आढळून आला. या तरुणीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, खुनापूर्वी या तरुणीवर अत्याचार झाला नाही, असे शवविच्छेदन अहवालातुन समोर आले आहे. मात्र, या तरुणीची ओळख पटविण्यात अजूनही पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान घटनेला तीन दिवसांचा कालवधी उलटल्यानंतर सुद्धा अद्याप या वयोगटातील तरुणी बेपत्ता असल्याची एकही तक्रार जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात नोंदविली नाही. त्यामुळे मृतक तरुणी जिल्ह्याबाहेरील असावी, असा संशय पोलिसांना आहे.
विदर्भातील आठ जिल्ह्यातून बेपत्ता तरुणींची माहिती चंद्रपूर पोलिसांनी मागितली आहे. मंगळवारला नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांना भद्रावतीला भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करुन जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या खुनाच्या तपासात जवळपास दोनशे पोलीस कर्मचारी गुंतले आहे. चंद्रपूरसह नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोदिंया, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातून मृतक युवतीच्या वयोगटातील बेपत्ता मुलींच्या तक्रारी चंद्रपूर पोलिसांनी मागितल्या आहे.
काय आहे प्रकरण? : भद्रावती शहरा लगतच्या तेलवासा शेतशिवारात सोमवारला निर्वस्त्र अवस्थेतील तरुणीचा मृतदेह मिळाला. घटनास्थळी पोहचल्यानंतर तिथले दृश्य बघून पोलीस सुद्धा चक्रावून गेले. मृतदेहाचे शिर बेपत्ता होते. त्यामुळे मृतक तरुणीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. घटना उघडकीस येवून तीन दिवसांचा कालावधी लोटला. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. घटनास्थळावरुन एक चार्जर आणि त्या तरुणीच्या पायातील जोडे पोलिसांच्या हाती लागले. या तरुणीचे वय २५ च्या घरात आहे. अद्याप पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नाही. त्यातही घटना उघडकीस येवून तीन दिवसांचा कालावधी उलटला. मात्र उद्याप जिल्ह्यातून बेपत्ता युवतीची एकही तक्रार समोर आली नाही. मृतक तरुणीची ओळख पटविण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. मृतदेह निर्जनस्थळी सापडला. त्यामुळे मुलीवर लैगिंक अत्याचार झाला, असावा असा संशय पोलिसांना होता. परंतु शवविच्छेदन अहवालात अशी कुठलीही घटना झाली नाही, हे स्पष्ट झाले. मात्र ही युवती कुमारिका नाही. तिने याआधी शारिरीक संबंध प्रस्तापित केले आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलीस पाटलांनाही आपल्या गावातील एखादी तरुणी बेपत्ता झाली, असल्यास तातडीने पोलिसांना कळविण्यास सांगितले आहे.
हेही वाचा - Waghoba Ghat Accident Palghar : वाघोबा घाटात ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात; दोन जणाचा जागीच मृत्यू