ETV Bharat / state

निवडणूक प्रचारात शेती आणि रोजगार हेच प्रमुख मुद्दे - पित्रोदा

माहिती तंत्रज्ञान हे शेती आणि ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी युपीए-३ निश्चित काम करेल, असा विश्वास सॅम पित्रोदांनी व्यक्त केला.

Sam Pitroda
author img

By

Published : Apr 6, 2019, 5:51 PM IST

मुंबई - सध्या देशातील शेती आणि रोजगार क्षेत्र अतिशय कठीण कालखंडातून जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात आणि सत्तेत आल्यानंतर शेती आणि रोजगार हेच प्रमुख मुद्दे असतील, असे काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी स्पष्ट केले. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

पित्रोदा हे गांधी कुटुंबीयांचे अनेक वर्षांपासूनचे सल्लागार आहेत. तसेच ते अनिवासी भारतीय काँग्रेसचे प्रमुख आहेत. त्यांनी रोजगार, शेतीतील समस्यांपासून सध्याच्या राजकीय परिस्थीतीवरील मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.

कृषीची समस्या सर्वात मोठी, मात्र प्रचारात रोजगाराला प्राधान्य - पित्रोदा
कृषी समस्या ही सध्याची देशासमोरील खूप मोठी समस्या आहे, असे पित्रोदा यांनी सांगितले. मात्र, प्रचारात रोजगार हाच सर्वांत प्रमुख मुद्दा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, 'रोजगाराच्या भयंकर परिस्थितीतून आपण जात आहोत. आपण नवे रोजगार निर्माण केलेलेच नाहीत. आपण रोजगारासाठी आवश्यक असणारी पोषक परिस्थितीच नष्ट केलेली आहे. त्यामुळे नवे रोजगार कसे निर्माण करणार, हा आपल्यासमोरील प्रश्न आहे.

नोटाबंदी, जीएसटी यांसारख्या घटकांमुळे परिस्थिती आणखी बिकटच झाली आहे. त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. राहुल गांधीचा आक्रमक प्रचार आणि प्रियांका गांधीच्या प्रवेशामुळे, निवडणुकीवर मोठा परिणाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, ही निवडणूक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील स्पर्धा नाही. हे भारतातील विचारधारांमधील आव्हान आहे. आपल्याला देश कशा पद्धतीने उभारायचा आहे, याचेच हे आव्हान आहे. ही लढाई द्वेषाचे राजकारण आणि प्रेमाचे राजकारण यांच्यातील आहे.

माहिती तंत्रज्ञान हे शेती आणि ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी युपीए-३ निश्चित काम करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. मुंबई प्रेस क्लब आयोजित वार्तालाप कार्यक्रमात खासदार कुमार केतकर आणि मुंबई प्रेसक्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग उपस्थित होते.

Intro:Body:MH_SamPitroda_PressClubAgariancrisesEmployment6.4.19 script

MH_SamPitroda_PressClubVDOs6.4.19

शेती आणि रोजगार क्षेत्रात सर्वात मोठे संकट:
सँम पित्रोदा

-मोदी सरकारने विश्वासार्हता गमावली
राहुल गांधी पंतप्रधान पदाचे सक्षम उमेदवार

मुंबई :देश सध्या शेती संकट आणि रोजगाराच्या अतिशय कठीण कालखंडातून जात आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात आणि सत्तेत आल्यानंतर शेती आणि फक्त रोजगार हाच प्रमुख मुद्दा असेल,' असे काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी स्पष्ट केले.

पित्रोदा हे गांधी कुटुंबीयांचे अनेक वर्षांपासूनचे सल्लागार असून, ते अनिवासी भारतीय काँग्रेसचे प्रमुख आहेत. रोजगार, शेतीतील समस्यांपासून सध्याच्या राजकीय परीस्थीतीवरील मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
मुंबई प्रेसक्लब आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते आज सहभागी झाले होते. खा. कुमार केतकर आणि मुंबई प्रेसक्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग यावेळी उपस्थित होते.

कृषी समस्या ही सध्याची देशासमोरील खूप मोठी समस्या आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, प्रचारात रोजगार हाच सर्वांत प्रमुख मुद्दा असेल, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'रोजगाराच्या भयंकर परिस्थितीतून आपण जात असून, आपण नवे रोजगार निर्माण केलेलेच नाहीत. आपण रोजगारासाठी आवश्यक असणारी पोषक परिस्थितीच नष्ट केलेली आहे. त्यामुळे नवे रोजगार कसे निर्माण करणार, हा आपल्यासमोरील प्रश्न आहे. नोटाबंदी, जीएसटी यांसारख्या घटकांमुळे परिस्थिती आणखी बिकटच झाली आहे. त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.' राहुल गांधीचा आक्रमक प्रचार आणि प्रियांका गांधीच्या प्रवेशामुळे, निवडणुकीवर मोठा परिणाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, ही निवडणूक म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील ही स्पर्धा नाही, असे सांगून ते म्हणाले, 'हे भारतातील विचारधारांमधील आव्हान आहे. आपल्याला देश कशा पद्धतीने उभारायचा आहे, याचेच हे आव्हान आहे. ही लढाई द्वेषाचे राजकारण आणि प्रेमाचे राजकारण यांच्यातील आहे.
माहीती तंत्रन्यान शेती आणि ग्रामीण भागात पोचवण्यासाठी युपीए-३ निश्चित काम करेल असे पित्रोदा म्हणाले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.