मुंबई - डोंगरीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेत्या राखी जाधव यांनी प्रशासनाच्या अकार्यक्षम व्यवस्थापनाला जवाबदार ठरवले आहे.
लोकांचा नाले, गटारात पडून मृत्यू होत आहेत. कुठे इमारतीच्या भिंती कोसळत आहेत तर कुठे इमारतीच्या-इमारती कोसळत आहेत. या सगळ्यांसाठी आपत्कालीन व्यवस्थापनाची व्यवस्था असल्याचे पालिकेकडून सांगितले जाते, पण ती व्यवस्था कुठे आहे. शहरातील प्रत्येक नाला आणि रस्त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. पण कोणत्याही अधिकाऱ्याचे याकडे लक्ष नाही. नागरिकांची काळजी घेण्यासाठी पालिका अकार्यक्षम आहे. आता मुंबईकरांनी आपली काळजी स्वत: घेण्याची वेळ आली आहे. कोट्यवधींचे प्रकल्प आणले जातात, पण त्याचा लाभ मुंबईकरांना मिळत नाही. चांगले रस्ते, नाले देण्यासोबतच पालिकेने आता नागरिकांना चांगली सेवा पुरवण्यावर भर दिला पाहिजे, असे त्या म्हणाल्या