ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक २०१९: नव मतदारांच्या मनात दडलंय काय?

नवीन मतदाराच्या मनात काय आहे? त्यांच्या येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? हे जाणून घेण्यासाठी इटीव्ही भारतने त्यांच्याशी केलेली खास बातचीत.

नवीन मतदार
author img

By

Published : Apr 1, 2019, 11:25 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर नवीन मतदार मतदानासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी नवीन मतदाराच्या मनात काय आहे? त्यांच्या येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? हे जाणून घेण्यासाठी इटीव्ही भारतने त्यांच्याशी केलेली खास बातचीत

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या ही मोठी आहे. तरुणांच्या मते निवडणुका येतात तेंव्हा प्रत्येक राजकीय पक्ष घोषणा करतात. त्या पूर्ण केल्या पाहिजेत. तसेच यावेळी मुख्य मुद्दा आरक्षण असणार आहे. काही तरुणींच्या मते, आरक्षण हे रद्द झाले पाहिजे. आम्हाला आरक्षणाची काही अडचण नाही आहे. पण जातीय नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले पाहिजे. मुंबईत सध्या मैदानांची संख्या घटत आहे. ती वाढवली पाहिजे.

काही नवीन मतदार म्हणाले, पहिल्यांदाच मतदान करत असल्यामुळे खूप उत्सुकता आहे. मी उमेदवाराचे प्रोफाइल व त्याची समाजासाठी काम करण्याची क्षमता पाहूनच मतदान करणार आहे. मी उमेदवारांची तरुणांसाठी काम करण्याची क्षमता पाहून निवड करणार आहे, असेही मत काही नवीन मतदारांनी व्यक्त केले.

Intro:मुंबई :
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर नवं मतदार मतदानाससाठी सज्ज झाले आहेत. यावेळी नवीन मतदाराच्या मनात काय आहे? त्यांच्या येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेय? हे जाणून घेण्यासाठी इटीव्ही भारत ने त्यांच्याशी केलेली खास बातचीत..Body:लोकसभा निवडणूकित पहिल्यांदा वोट करणाऱ्या मतदारांची संख्या ही मोठी आहे. पण या मतदारांना मनात काय आहे हे ई टीव्ही भारत ने जाणून घेतले आहे.

तरुणांच्या मते जेव्हा निवडणुका येतात तेव्हा प्रत्येक राजकीय पक्ष घोषणा करतात. त्या पूर्ण केल्या पाहिजेत. तसेच यावेळी मुख्य मुद्दा आरक्षण असणार आहे. काही तरुणींच्या मते आरक्षण हे रद्द झाले पाहिजे. आम्हाला आरक्षणाची काही अडचण नाही आहे. पण जातीय नाही तर आर्थिक आरक्षण झाले पाहिजे. मुंबईत सध्या मैदानाची संख्या घटत आहे ती वाढवली पाहिजे जेणेकरून मुलांना खेळायला मिळाले पाहिजे.

पहिल्यांदाच मतदान करत असल्यामुळे खूप उत्सुकता आहे. मी उमेदवाराचे प्रोफाइल व त्याची समाजासाठी काम करण्याची क्षमता पाहून मतदान करणार आहे.
मी उमेदवाराची तरुणांसाठी काम करण्याची क्षमता पाहून निवड करणार आहे असेही मत काही नवं मतदारांनी व्यक्त केले.

नोट

चेअरमन साहेबांनी सांगितलेल्या आयडिया स्टोरी नुसार
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.