मुंबई - मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याच्या सेवेस आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाले. चेंबूर ते वडाळा हा ८.२६ किलोमीटर लांबीचा मोनोरेल्वेचा पहिला टप्पा या आधी कार्यरत झाला होता. आता दुसऱ्या टप्प्यात ११.२८ किलोमीटर लांबीचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा टप्पा सुरू झाला आहे. मुंबईकरांना १९.५४ किलोमीटर लांबीचा मोनो रेल्वेचा प्रवास करता येणार आहे.
मोनो रेल्वे मार्गावरील स्थानके
टप्पा १
चेंबूर, वि. एन. पुरावे, फर्टिलायजर टाऊनशीप, भारत पेट्रोलीयम, म्हैसूर कॉलनी,
भक्ती पार्क, वडाळा डेपो,
टप्पा २
जी. टी. बी. नगर, अँटॉप हील, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर -पूर्व, नायगाव, डॉ. आंबेडकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परेल, संत गाडगे महाराज चौक.