मुंबई - विधानसभेच्या कामकाजात प्रचंड गोंधळ उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थसंकल्प फुटला असल्याची घटना घडली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनीच अर्थसंकल्प सभागृहाच्या बाहेर फोटल्याची घणाघाती टीका धनंजय मुंडे केली आहे. यानंतर जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. यानंतर अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प वाचणं थांबवलं.
या प्रकारानंतर सभागृह अध्यक्ष रामराजे निंबाळकरांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सर्व गट नेते आपआपल्या दालनात बैठकी घेत आहेत. सभागृहात अजूनही गोंधळाचेच वातावरण आहे. यात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने उतरले आहेत. दरम्यान चंद्रकांत पाटील आमि धनंजय मुंडे यांच्या बाचाबाची झाली आहे.
सत्ताधाऱ्यांनी सभापतींवर अविश्वास मांडण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थमंत्र्याचं भाषण थांबवलय, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला. तसेच आम्ही सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडणार, असल्याचेही ते म्हणाले.