ETV Bharat / state

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षकांचे निलंबन - बुलडाणा जिल्हा न्यूज अपडेट

कर्तव्यात कसूर करणे बुलडाणा वन विभागातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना बुलडाणा उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी निलंबित केले आहे. यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून, वनपाल सलीम खान गुलशेर खान व वनरक्षक गजानन रमेश सोळंके अशी या निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षकांचे निलंबन

author img

By

Published : Feb 26, 2021, 5:05 PM IST

बुलडाणा - कर्तव्यात कसूर करणे बुलडाणा वन विभागातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना बुलडाणा उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी निलंबित केले आहे. यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून, वनपाल सलीम खान गुलशेर खान व वनरक्षक गजानन रमेश सोळंके अशी या निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षकांचे निलंबन

अवैध वनसंपदेच्या तस्करी प्रकरणात निलंबन

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातून सातपुडा पर्वतरांगा जातात. या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे, त्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात वनसंपदेची तस्करी होते. वनपाल सलीम खान यांच्याकडे जळगाव जामोद वनपरिक्षेत्राचा प्रभार आहे, मात्र त्यांच्या कार्यक्षेत्रात डिंकाचा अवैध व्यवसाय चालत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले. तसेच बीट क्रमांक 1 मध्ये कार्यरत वनरक्षक गजानन रमेश सोळंके यांच्या कार्यक्षेत्रात तब्बल 14 हेक्टर वनक्षेत्र जळून 11 हजार 550 पन्नास रुपयांचे नुकसान झाले होते. या आगीच्या घटनेवेळी वनरक्षक हे गैरहजर होते, त्यामुळे त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.