ETV Bharat / state

एसटीच्या टपावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, व्हिडीओ व्हायरल - टपावरून

विद्यार्थ्यांना चक्क एसटीच्या टपावर बसून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात दिसून आले आहे.

एसटीच्या टपावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, व्हिडीओ व्हायरल
author img

By

Published : Jul 9, 2019, 5:25 AM IST

बुलडाणा - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. शाळा, महाविद्यालयासाठी पासेस दिले जातात. मात्र, बसेस कधीच वेळेवर येत नाहीत. दैनंदिन वेळापत्रक पाळले जात नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क एसटीच्या टपावर बसून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात दिसून आले. विद्यार्थी एसटीच्या टपावर बसून प्रवास करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एसटीच्या टपावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, व्हिडीओ व्हायरल

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी कवळगाववरून खामगावकडे निघालेल्या बस (एम-40-एन-9666) च्या टपावर बसून दिवठाणा येथील शाळेचे विद्यार्थी जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बसमध्ये जागा नसल्यामुळे हे विद्यार्थी बसच्या टपावर बसून प्रवास करत होते. सुमारे 35 कि.मी च्या धोकादायक प्रवासात सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला इजा पोहचली नाही.

शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी बस वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना असा हा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी कित्येक तास बसस्थानकावरच असतात. मात्र, बसही कधीच वेळेवर येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोमवारी टपावर बसून प्रवास केला. या प्रकरणी चालकाची चौकशी करण्याचे आदेश खामगाव येथील आगार व्यवस्थापक रितेश पुलपगारे यांनी दिले आहेत.

Intro:Body:बुलडाणा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. शाळा, महाविद्यालयासाठी पासेस दिल्या जातात. मात्र बसेस कधीच वेळेत येत नाही. दैनंदिन वेळापत्रक पाळले जात नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क एसटीच्या टपावर बसून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात दिसून आले.विद्यार्थी एसटीच्या टपावर बसून प्रवास करीत असल्याचा व्हिडीओ शोशल मीडियावर व्हायरल झालंय

सोमवारी कवळगाव वरून खामगाव कडे निघालेल्या खामगाव आगाराच्या एसटी बसच्या टपावरून दिवठाणा येथील शाळेचे विदयार्थी बस मध्ये जागा नसल्यामुळे बसच्या टपावर बसुन जातानां दिसून आल्याचा व्हिडीओ व्हायरल झालंय. ३५ कि. मी. च्या या धोकादायक प्रवासात वसुदैवाने कुठल्याही विद्यार्थ्यंला इजा पोहचली नाही. शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी बसफेरी वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना हा जीवघेणा पवित्रा घ्यावा लागला. शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी कित्येक तास बसस्थानकावरच असतात. बसही कधीच वेळेवर येत नाही. सोमवारी सुद्धा बसस्थानकावर एसटी बसची वाट पाहात विद्यार्थि बसून होते. मात्र बस क्रमांक एम 40 एन 9666 ही बस आली तेव्हा प्रवास्यांमुळे बस भरल्याने विद्यार्थ्यांनी एसटीच्या टपावरून प्रवास केला व याचा व्हिडीओ व्हायरल झालंय दुसरी कडे चालक वाचकावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत खामगाव येथील आगार व्यवस्थापक रितेश पुलपगारे यांनी दिले.

बाईट -रितेश पुलपगारे, आगार व्यवस्थापक खामगाव

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.