ETV Bharat / state

रॉयल्टी घोटाळा: बनावट रॉयल्टीवर ओरिजनल इनवाईस नंबर; शौर्या टेक्नोशॉप कंपनीचा प्रताप - crime

विशेष म्हणजे बनावट रॉयल्ट्या ह्या नागपूर, अकोलासह अनेक जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत. यावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याची बनावट सही व शिक्के मारलेले आहे. या सर्व प्रकारामूळे आणि शौर्या टेक्नोशॉप कंपनीच्या कारभारामुळे सरकारचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.

शौर्या टेक्नोशॉप कंपनीचा लोगो
author img

By

Published : Jul 9, 2019, 7:42 PM IST

Updated : Jul 9, 2019, 8:34 PM IST

बुलडाणा- वाळू घाटावरून वाळूची उचल करण्याकरता घाटधारकाच्या व खनिकर्म विभागाच्या परवानगीविना वाळूघाटावर दुसऱ्याच्या नंबरची नोंदणी केल्याचा प्रकार शौर्या टेक्नोशॉप कंपनीने केला आहे. कंपनीने गोपनीयतेचा भंग करीत 37 ब्रासच्या बनावट रॉयल्टीवर ओरिजनल इनवाईस नंबर देण्याचा प्रतापही केला आहे. या प्रकरणात बुलडाणा शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी वाळू घाटधारक विलास मास्कर यांनी अनधिकृतपणे वापरण्यात आलेल्या 37 ब्रास रॉयल्टीच्या भरपाईची मागणी केली आहे. तसेच शौर्या टेक्नोशॉप कंपनीचे व नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर धारकांचे आणि बुलडाणा खनिकर्म विभागाचे काही संबंध आहेत काय? याची चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे.

प्रतिक्रिया- अुनक्रमे शिवाजी कांबळे (पोलीस निरीक्षक, बुलडाणा), विलास मास्कर (तक्रार कर्ता), प्रमोद पाटील (प्रोजेक्ट मैनेजर,शौर्या टेक्नोशॉप कंपनी), आर बी मारबते (खनिकर्म अधिकारी). तसेच शेवटी प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पाटील हे प्रात्यक्षिक दाखवताना.

या प्रकरणात बुलडाणा जिल्ह्याच्या व जळगाव जिल्ह्याच्या देखील बनावट रॉयल्टया असल्याचे समोर आले आहे. तर राज्यात अशा प्रकारे हजारो बनावट रॉयल्ट्यावर बनावट इनवाईस नंबर टाकून गोरख धंदा सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे आणि शौर्या टेक्नोशॉप कंपनीच्या कारभारामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे बनावट रॉयल्ट्या ह्या नागपूर, अकोलासह अनेक जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत. यावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याची बनावट सही व शिक्के मारलेले आहे.

सदर प्रकरणात बुलडाण्याचे खनिकर्म अधिकारी आर. जी. मारबते आणि अकोला खनिकर्म अधिकारी डॉ. ए. पी. दोड यांना चौकशीसाठी नेमण्यात आले आहे. या प्रकरणात बुलडाणा शहर पोलिसात जिल्हा खनिकर्म अधिकारी मारबते यांच्या तक्रारीवरून कलम 420, 468, 471, 469, 34 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे हे तपास करीत आहेत. यामध्ये आरोपीचा शोध सुरू असून प्रकरणाचा पर्दा फाश करणार असल्याचे मत पोलीस निरीक्षक शिवाजी काबंळे यांनी सांगितले आहे.

Washim
डूब्लिकेट रॉयल्टीवर ओरिजनल इनवाईस नंबर देण्याचा प्रताप शौर्या टेक्नोशॉप कंपनीने केला आहे.

शौर्या टेक्नोशॉप कंपनी मार्फत गोपनीयतेचा भंग

शासनाने महसूल वाढविण्यासाठी आणि स्वच्छ प्रशासन ठेवण्यासाठी वाळू विकण्याकरता ऑनलाइन पद्धतीने रॉयल्टी देण्याचे सुरू केले आहे. यानुसार नोंदणी झालेल्या मोबाईल क्रमांकावरून ऑनलाइन इनवाईस नंबर दिला जातो. अशा प्रकारे ऑनलाइन पद्धतीचे कार्य करण्याकरिता गेल्या पाच वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राचा ठेका शौर्या टेक्नोशॉप कंपनीला दिलेला आहे. मात्र, शौर्या टेक्नोशॉप कंपनी मार्फत रॉयल्टीवर छापण्यात आलेला बारकोड हा अनुक्रमांकानुसार छापण्यात येत आहे. अनुक्रमांकानुसार बारकोड छापल्यामुळे वाळू घाटधारकाच्या परवानगी विना दुसऱ्याचा मोबाईल नंबर नोंदणी करून बनावट रॉयल्टीच्या बारकोड स्कॅन करून ओरिजनल इनवाईस नंबर दिले गेले. जर बारकोड नंबर अनुक्रमे नसते तर बनावट रॉयल्ट्याचे बारकोड नंबर स्कॅन झालेच नसते आणि तर बवावट रॉयल्टीवर ओरिजनल इनवाईस नंबर भेटलेच नसते. यामुळेच शौर्या टेक्नोशॉप कंपनी गोपनीयतेचा भंग करत आहे.

जप्त करण्यात आलेल्या रॉयल्टया बनावट

अभिजित मास्कर यांनी वाहन धारकाकडून जप्त केलेल्या सर्व रॉयल्ट्या बनावट आहेत असा खुलासा शौर्या टेक्नोशॉप कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पाटील यांनी केला आहे. त्यांनी ओरिजन आणि बनावट कसे ओळखावे हे प्रात्यक्षिक करून दाखविले. ओरिजनल रॉयल्टी हे चेक्स पेपरने तयार केले असून रॉयल्टीमधील अशोक स्तंभाची छायाकृती लेजर लाईटमध्ये दिसते तर छापण्यात आलेला ट्रेडमार्क पाण्याने पुसतो. बनावट रॉयल्टीमध्ये अशोक स्तंभाची छायाकृती दिसत नाही आणि ट्रेडमार्क पुसला जात नाही.

Intro:Body:कृपया बातमी पैकेज घ्यावी..

exclusive.....

Sulg:- Royalty scam

स्टोरी:- रॉयल्टी घोटाळा: डूब्लिकेट रॉयल्टीवर ओरिजनल इनवाईस नंबर..
घाटधारकाच्या व खनिकर्म विभागाच्या परवानगी विना केले वाळूघाटावर दुसऱ्याच्या नंबरची नोंदणी,शौर्या टेक्नोशॉप कंपनीचा प्रताप, गुन्हा दाखल..

बुलडाणा:- वाळू घाटावरून वाळूची उचल करण्याकरिता घाट धारकाच्या आणि खनिकर्म विभागाच्या परवानगी विना दुसऱ्याचा मोबाईल नंबर नोंदणी करून गोपनीयतेचा भंग करीत 37 ब्रासचे डूब्लिकेट रॉयल्टीवर ओरिजनल इनवाईस नंबर देण्याचा प्रताप शौर्या टेक्नोशॉप कंपनी केल्याचा बुलडाण्यात उघडकीस आला आहे.प्रकरणी वाळू घाटधारक विलास मास्कर यांनी अनधिकृतपणे वापरण्यात आलेल्या 37 ब्रास रॉयल्टीच्या भरपाई देवून शौर्या टेक्नोशॉप कंपनीचे व नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर धारकांचे आणि बुलडाणा खनिकर्म विभागाचे काही संबंध असल्याबाबत चॉकशी करण्याकरिता तक्रार जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कडे दिली आहे.प्रकरणात बुलडाणा जिल्ह्याचे व जळगाव जिल्ह्याचे देखील डूबलिकेट रॉयल्टया असल्याचे समोर आले आहे.तर राज्यात अश्या प्रकारे हजारो डूब्लिकेट रॉयल्टयावर डूब्लिकेट इनवाईस नंबर टाकून गोरख धंदा सुरू आहे.या सर्व प्रकारामूळे आणि शौर्या टेक्नोशॉप कंपनीच्या कारभारामुळे शासनाचा कोट्या रूपयांचा महसूल बुडत आहे.तर सर्व प्रकरणात संपूर्ण बाबीची पडताळणी केली असता ऑनलाइन पद्धतीने ज्या प्रकारे गोपनीय पद्धतीने कार्य करायला पाहिजे त्या पद्धतीने शौर्या टेक्नोशॉप कंपनी काम करीत नसून अजब प्रकारेच कार्य करत असल्याचे समोर आले आहे.अश्या प्रकारे डूब्लिकेट रॉयल्टीचा गोरख धंदा संपूर्ण राज्य भरात चालत असल्याची चिन्हे आहे.तर प्रकरणात बुलडाणा शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे....

मलकापूर तालुक्यातील मौजे काळेगाव शिवारातील तहसीलदाराने शासकीय जमिनीवर जप्त केलेल्या 460 ब्रास वाळू साठ्याची हरासी मध्ये 6 लाख 25 हजार रुपये भरून अभिजित विलास मास्कर यांनी घेतली होती.हे वाळू उचल करण्यासाठी विलास मास्कर यांना 460 ब्रासचे रायल्टया शौर्या टेक्नोशॉप कंपनीकडून बुलडाणा जिल्ह्यातील खनिकर्म विभागमधून मिळाले होते. जो वाळू घाटधारक आहे त्याच्या व खनिकर्म विभागाच्या विभागाच्या परवानगीने शौर्या टेक्नोशॉप कंपनी दिलेल्या मोबाईल नंबर नोंदणी करून इनवाईस नंबर दिल्या जातो.ऑनलाइन पद्धतीने रॉयल्टी वरील बारकोड स्कैन करून आणि बारकोड क्रमांक अप्समध्ये टाकून इनवाईस नंबर घेतल्या जाते.त्याच पद्धतीने आपल्या दोन मोबाईल नंबर नोंदणी करून इनवाईस मारत असतांना विलासच्या लक्षात आले की इनवाईस नंबर मिळत नाही आणि तो इनवाईस नंबर या अगोदर वापरला गेला आहे.याची माहिती घेतली असता एक अन्य मोबाईल नंबर विलासच्या आणि खनिकर्म विभागाच्या परवानगी विना शौर्या टेक्नोशॉप कंपनीने नोंदणी केलेला असून याच मोबाईल क्रमांकावरुन डूब्लिकेट रॉयल्टयाला ओरिजनल इनवाईस नंबर दिल्या जात आहे.असे ऐकून 37 ब्रास वाळू उचलची इनवाईस नंबर दिल्या गेले आहे.चॉकशी नंतर असे समोर आले की तिसरा मोबाईल नंबर शौर्या टेक्नोशॉप कंपनीने कॉल सेन्टरवरून परवानगी विना नोंदणी केली आहे.प्रकरणी विलास मास्कर यांनी जिल्हाधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देवून माझ्या परवानगी विना तिसरे मोबाईल नंबर नोंदणी कशी झाली यात बुलडाणा खनिकर्म विभाग व शौर्या टेक्नोशॉप कंपनीचे काही आर्थिक संबंध आहे काय याची चॉकशी करण्याची मागणी केली.विशेष म्हणजे देण्यात आलेल्या डूब्लिकेट रॉयल्टया हे नागपूर,अकोलासह अनेक जिल्ह्यात देण्यात आले आहे इतकेच नव्हे तर अश्याच प्रकारे जळगांव खान्देश जिल्हयातील डूब्लिकेट रॉयल्टया आढळल्या आहे.यावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याचे बनवत सही व शिक्के मारलेले आहे.तर एव्हढेच नव्हे तर अश्या डूब्लिकेट रॉयल्टीवर ओरिजनल इनवाईस नंबर दिलेल्या प्रकरणात समोर आले आहे की शौर्या टेक्नोशॉप कंपनी बारकोड नंबर अनुक्रमे नंबरप्रमाणे छापत आहे आणि गोपनीयतेचा भंग करीत आहे.सदर प्रकरणात बुलडाण्याचे खनिकर्म अधिकारी आर.जी.मारबते आणि अकोला खनिकर्म अधिकारी डॉ.ए पी दोड यांना चॉकशी साठी नेमण्यात आले आहे.प्रकरणात बुलडाणा शहर पोलिसात जिल्हा खनिकर्म अधिकारी मारबते यांच्या तक्रारीवरून कलम 420,468,471,469,34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे हे तपास करीत आहे.या मध्ये आरोपीचा शोध घेत असून प्रकरणात प्रदा फाश करणार असल्याचे मत शिवाजी काबंळे यांनी सांगितलंय मात्र या सर्व प्रकारामूळे आणि शौर्या टेक्नोशॉप कंपनीच्या कारभारामुळे शासनाचा कोट्या रूपयांचा महसूल बुडत आहे.याची उच्च स्तरीय चॉकशी होणे गरजेचे आहे.

बाईट:- 1) विलास मास्कर, तक्रार कर्ता
2) आर बी मारबते,खनिकर्म अधिकारी
3) प्रमोद पाटील, पोर्जेक्त मैनेजर,शौर्या टेक्नोशॉप कंपनी
4) शिवाजी कांबळे,पोलीस निरीक्षक,बुलडाणा

-शौर्या टेक्नोशॉप कंपनी मार्फत गोपनीयतेचा भंग-

शासनाने महसूल वाढविण्यासाठी आणि स्वच्छ प्रशासन ठेवण्यासाठी वाळू विकण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने रॉलटी देण्याचे सुरू केले आहे.अप्स नुसार नोंदणी झालेल्या मोबाईल क्रमांकावरून ऑनलाइन इनवाईस नंबर दिला जातो या ऑनलाइन पद्धतीचा कार्य करण्याकरिता महाराष्ट्रभराचा ठेका शौर्या टेक्नोशॉप कंपनीला गेल्या 5 वर्षांपासून दिलेला आहे. कंपनीचे कार्य असे आहे. घाटावरून वाळू उचल करतांना ज्यांनी वाळू घाट विकत घेतला आहे.त्याला शौर्या टेक्नोशॉप कंपनी मार्फत रॉयल्टया दिल्या जाते.घाटधारक व खनिकर्म विभागाच्या त्य परवानगीने शौर्या कंपनी मोबाईल नंबर त्या घाटावर नोंदणी करून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाइन पद्धतीने वाळू उचल करणाऱ्या धारकाच्या वाहन क्रमांकासह वाळू कोठून-कोठे नेण्यात येणार आहे यासह वाहन क्रमांकासह मालकांचे नाव याबाबत माहिती भरली जाते व रॉयल्टी वर असलेले बारकोड शौर्य टेक्नोशॉप कंपनीने दिलेल्या मोबाईल अप्स मध्ये स्कैन करून किंवा बारकोड टाकून शौर्या टेक्नोशॉप कंपनीच्या माध्यमातून त्या स्कैन केलेल्या रॉयल्टीला इनवाईस नंबर दिला जातो.या इनवाईस नंबर नुसार वाळू उचल करणाऱ्यांची माहिती समावेश केली जाते. आणि वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनांची तपासणी जर महसूल अधिकारी करीत असतील तर त्यांच्या मोबाईल मधील अप्स मध्ये मिळालेल्या इनवाईस नंबर टाकल्यावर नोंदणी केलेली सर्व माहिती समोर येते.मात्र विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात ऑनलाइन पद्धतीने ज्या प्रकारे गोपनीय पद्धतीने कार्य करायला पाहिजे त्या पद्धतीने शौर्या टेक्नोशॉप कंपनी काम करीत नसून अजब प्रकारेच कार्य करत असल्याचे समोर आले आहे.शौर्या टेक्नोशॉप कंपनी मार्फत रॉयल्टी वर छापण्यात आलेल्या बारकोड हा अनुक्रमे क्रमांक नुसार छापण्यात येत आहे.याच अनुक्रमे क्रमांकाचे बारकोड छापल्यामुळे वाळू घाटधारकाच्या परवानगी विना दुसऱ्याचा मोबाईल नंबर नोंदणी करून डूब्लिकेट रॉयल्टीच्या बारकोड स्कैन करून ओरिजनल इनवाईस नंबर दिल्या गेले.जर बारकोड नंबर अनुक्रमे नसते तर डूब्लिकेट रॉयल्टयाचे बारकोड नंबर स्कॅन झालेच नसते आणि तर डूब्लिकेट रॉयल्टीवर ओरिजनल इनवाईस नंबर भेटलेच नसते यामुळेच शौर्या टेक्नोशॉप कंपनी गोपनीयतेचा भंग करीत आहे.अश्या डूब्लिकेट रॉयल्टया बुलडाण्यातीलच नव्हे तर जळगाव खान्देश जिल्ह्याच्या देखील आहे यावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याचे बनवत सही व शिक्के मारलेले आहे.यामुळे शासनाचा कोटयावधी रुपयांचा महसुल बुडत आहे.प्रकरणाची चॉकशी केली असता हा रॉयल्टी घोटाळा संपूर्ण राज्य भरात चालत असल्याचा समोर येईल..

-जप्त करण्यात आलेल्या रॉयल्टया डूब्लिकेट-
वाहन धरकाकडून अभिजित मास्कर यांनी जप्त केलेल्या सर्व रॉयल्टया डूब्लिकेट असल्याबाबत खुलासा शौर्या टेक्नोशॉप कंपनीच्या पोर्जेक्त मैनेजर प्रमोद पाटील यांनी केला आहे. त्यांनी ओरिजन आणि डूब्लिकेट कसे ओरखावे हे प्रात्यशिक करून दाखविले.ओरिजन रॉयल्टी हे चेक्स पेपर ने तय्यार केले असून रॉयल्टी मधील अशोक स्थंभची छायाकृती लेजर लाईट मध्ये दिसते तर छापण्यात आलेला टेडमार्क पाण्याने पुसते आणि डूब्लिकेट रॉयल्टी मध्ये कुठलेच प्रकारचे अशोक स्थंभची छायाकृती दिसत नाही आणि टेडमार्क पुसल्या जात नाही..

-वसीम शेख,बुलडाणा-

एकूण 13 फाईल आहे पाठवत आहे...Conclusion:
Last Updated : Jul 9, 2019, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.