ETV Bharat / state

चोरट्यांनी दोन लाखांची बॅग पळवली; मलकापूर शहरातील भर चौकातील घटना - मलकापूर चोरी घटना

मलकापूर शहरातील निमवाडी चौक परिसरात गुरुवारी रात्री ऑटोवरून आलेल्या चोरट्यांनी अडत व्यावसायिकाच्या हातातील 2 लाख 31 हजार रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केल्याची घटना घडली.

robbery-at-malakapur
चोरट्यांनी दोन लाखांची बॅग पळवली; मलकापूर शहरातील भर चौकातील घटना
author img

By

Published : Nov 28, 2019, 1:20 PM IST

बुलडाणा - मलकापूर शहरातील निमवाडी चौक परिसरात गुरुवारी रात्री ऑटोवरून आलेल्या चोरट्यांनी अडत व्यावसायिकाच्या हातातील 2 लाख 31 हजार रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केल्याची घटना घडली.

चोरट्यांनी दोन लाखांची बॅग पळवली; मलकापूर शहरातील भर चौकातील घटना

हेही वाचा - महावितरणचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात; लाचेची रक्कम ऐकून व्हाल थक्क

अडत व्यापारी सुगनचंद कोचर हे दिवसभराचे काम आटोपून घरी पायी परत जात असताना रात्री 9 च्या सुमारास आलेल्या एका ऑटो रिक्षामधील चोरट्याने कोचर यांच्या हातातील बॅग पळवली. त्यानंतर रिक्षा वेगाने गांधी चौकच्या दिशेने निघाला. रिक्षाचा पाठलाग कोचर यांनी व तेथील नागरिकांनी काही अंतरापर्यंत केला. मात्र, ऑटो रिक्षा वेगात असल्यामुळे चोरट्यांना पळून जाण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिसरातील दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले आहेत. मात्र, शुक्रवारी सकाळपर्यंत काहीही निष्पन्न झाले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - बुलडाण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाला जबर मारहाण करुन चोर फरार

Intro:Body:Mh_bul_The bag and fled _10047

Story : २.३१ लाखाची बॅग हिसकावून पळविली पोबारा
मलकापूर शहरातील भरचौकातील घटना

बुलडाणा : मलकापूर शहरातील निमवाडी चौक परिसरात गुरुवारी रात्री ऑटोवरून आलेल्या अज्ञात चोरट्यानी अडत व्यावसायिकाच्या हातातील दोन लाख ३१ रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. रात्री साडे नऊच्या सुमारास व्यापारी हे घरी जात असतांना ही घटना घडली आहे.
मलकापूर शहरातील निमवाडी चोक परिसरात शहरातील अडत व्यापारी सुगनचंद कोचर हे दिवसभराचे काम आटोपून घरी पायी परत जात असताना रात्री 9 वाजेच्या सुमारास निमवाडी चोक परिसरात मागून आलेल्या एका ऑटो रिक्षा मधील इसमाने कोचर यांच्या हातातील बॅगला झटका मारून ती बॅग पळवली. बॅगमध्ये रुपये दोन लाख 31 हजार रोख स्वरूपात होते. रिक्षा वेगाने तेथून गांधी चौक च्या दिशेने निघाली बॅग पळवली त्या ऑटो रिक्षा चा पाठलाग कोचर यांनी व तेथील नागरिकांनी काही अंतरापर्यंत केला परंतु ऑटो रिक्षा वेगात असल्या कारणाने ऑटो रिक्षातील बॅग सह चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या परिसरातील दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन पुढील तपास सुरु केला आहे. मात्र आज सकाळ पर्यंत काहीही निष्पन्न झाले नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाईट - सुगनचंद कोचर (अडत व्यापारी) निळा टी शर्ट
बाईट - प्रत्यक्षदर्शी

- फहीम देशमुख
9922014466Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.