बुलडाणा - पोलीस लाईनमधील क्वार्टरमधून (police line quarter buldana) स्विफ्ट डिझायर कार बाहेर काढत असल्यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने एका चारचाकी वाहनाने नारळाने भरलेल्या हातगाडीला धडक देत ग्रामीण पोलीस स्टेशन समोर उभ्या असलेल्या तीन दुचाकींना धडक दिली. (police officer's car hit buldana) या धडकेत याठिकाणी असलेला झाड पडल्याची घटना 17 नोव्हेंबरच्या सकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
घटना काय?
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील (rural police station buldana) पोलीस क्वार्टरमधून एमएच 30 एझेड 9907 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार 17 नोव्हेंबरच्या सकाळी 11 वाजता आरएसआय चतरसिंग सोळंके हे बाहेर काढत होते. यावेळी त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांनी सुरुवातीला समोर उभी असलेली एमपी 19 ऐपी 4257 क्रमांकाची इंडिका चारचाकी वाहनाला बाजूने धडक मारली. तसेच समोर उभी असलेल्या नारळाने भरलेल्या हातगाडीला धडक दिली. यानंतर त्यांनी स्विफ्ट डिझायर कारने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरील झाडाजवळ उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तीन दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, दोन दुचाकी स्विफ्ट डिझायर कार खाली दाबल्या गेल्या. एक दुचाकी बाजुला फेकली गेली. तर समोरील मोठ्ठे भेंडफळ जातीचे झाड मुळासह खाली पडली होते. ज्या दुचाकींचे अपघातात नुकसान झाले होते, त्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
हेही वाचा - ST Worker Strike : संपावर निघणार तोडगा? राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण
चौकशी करून कारवाई करणार -
पोलीस अधिकाऱ्यांची कारच्या धडकेत ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरील झाड पडल्याने त्या झाडेला कापल्या गेले आहे. याची तुमच्याकडे नोंद केली गेली आहे का? असे संबंधित अधिकाऱ्यांना विचारल्यावर आमच्याकडे अशी नोंद नाही. झाड कापण्यासाठी रीतसर वृक्ष अधिनियम 1975च्या कलम 8 क नुसार परवानगी घेवूनच झाड कापल्या जाते. ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर झाड कापण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नाही. म्हणून या प्रकारची संपूर्ण चौकशी करून वृक्ष अधिनियम 1975 नुसार कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया नगर परिषदेचे वृक्ष अधिकारी तथा आरोग्य अधिकारी सुनिल बेडवाल यांनी दिली आहे. आता विनापरवानगी झाड कापल्याप्रकरणी नगर परिषदेकडून काय कारवाई करण्यात येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, याप्रकरणी आरएसआय सोळंके यांना मोबाईलद्वारे विचारल्यावर त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.