ETV Bharat / state

बुलडाणा : कोविड रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांचे हाल; एका रुग्णाचा मृत्यू - patient died covid Hospital Malkapur

जिल्ह्यातील मलकापूर शहरात तांत्रिक कारणाने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय कोविड रुग्णालयाचाही विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे, उपचार घेणाऱ्या रुग्णांचे हाल झाले असून व्हेंटिलेटर बंद झाल्याच्या 15 मिनिटानंतर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना काल रात्री घडली.

covid Hospital Power Supply cut Malkapur
विद्युत पुरवठा खंडित रुग्ण मृत्यू मलकापूर
author img

By

Published : May 1, 2021, 1:39 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर शहरात तांत्रिक कारणाने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय कोविड रुग्णालयाचाही विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे, उपचार घेणाऱ्या रुग्णांचे हाल झाले असून व्हेंटिलेटर बंद झाल्याच्या 15 मिनिटानंतर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना काल रात्री घडली.

माहिती देताना मलकापूरचे नगराध्यक्ष अ‌ॅड. हरीश रावळ

हेही वाचा - 'राज्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालयांचा दर्जा सरकारीच केला पाहिजे'

रुग्णालयात 33 रुग्ण घेत होते उपचार

मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णालय असून यामध्ये एकूण 33 कोरोनाबाधित उपचार घेत होते. त्यापैकी 13 रुग्ण ऑक्सिजनवर, 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर व उर्वरित रुग्ण उपचार घेत होते. दरम्यान काल रात्री 9 वाजून 30 मिनिटाला तांत्रिक अडचणीमुळे मलकापूर शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाला. यावेळी रुग्णालयातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला. यामुळे ऑक्सिजनवरील रुग्णांचे हाल झाले. शिवाय एका रुग्णाचे व्हेंटिलेटर बंद झाल्याने त्याचा अवघ्या 15 मिनिटातच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. याबाबतची माहिती मलकापूरचे नगराध्यक्ष अ‌ॅड. हरीश रावळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी विद्युत पुरवठा सुरू करण्याची विनंती केली व ज्या रुग्णांचे हाल होत होते त्यांना अन्य रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली.

कोविड रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रावळ हे रुग्णालयात मदतीसाठी गेले, त्यावेळी त्यांनी रुग्णांचे हाल पाहिले व त्यांना मदत करण्याचे प्रयत्न केल्यानंतर ही आपबिती सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

हेही वाचा - कोविड चाचणी न करताच रुग्णांवर उपचार प्रकरणात लवकरच कारवाई - जिल्हा शल्य चिकित्सक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.