बुलडाणा - एकतर्फी प्रेमातून पुणे येथील खडकवासला भागात कोल्हेवाडी येथे गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कारमधून जाणाऱ्यावर हा गोळीबार करण्यात आला. हा प्रकार गुरुवारी (२७ मे) रोजी घडला. याप्रकरणी हवेली पोलिसांनी रावण चंद्रकांत उभे (रा. कोल्हेवाडी) या व्यक्तीस अटक केली. रावण उभे या व्यक्तीला ही पिस्तूल बुलडाणा जिल्ह्यातील आपल्या मित्राकडू मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार (२८ मे) रोजी पुणे पोलिसांनी शेगावातून या पिस्तुल देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. रवींद्र रमेश खेडकर असे शेगावातून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
'शेगावच्या आरोपीने ४५ हजार रुपयांत विकली होती पिस्तुल'
एकतर्फी प्रेमातून गोळीबाराची घटना घडल्याने खडकवासला परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना येथील कोल्हेवाडी येथे घडली. कारमधून जाणाऱ्या व्यक्तीवर गोळीबार केला. या प्रकरणी अक्षय चंद्रकांत दुबे याला हवेली पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. या घटनेत वापरलेली देशी पिस्तूल ही शेगावच्या एका मित्राने आपल्याला ४५ हजार रुपयांना विकल्याचे सांगितले. यानंतर आज शुक्रवारी पुणे शहरातील हवेली पोलिसांनी शेगावातून पिस्तूल विकणारा रवींद्र रमेश खेडकर याला ताब्यात घेतले.
हेही वाच - हरवलेले 1 लाख 72 हजार रुपये पोलिसांनी शोधले अवघ्या तीन तासांत, वृद्धाला अश्रू अनावर