ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात 9 जणांनी केली कोरोनावर मात

जिल्ह्यात कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 42 झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61 टक्के झाले आहे. ही आकडेवारी दिलासा देणारी आहे.

Doctors congratulating patients
कोरोनोवर मात केलेल्या रूग्णांचे अभिनंदन करताना डॉक्टर
author img

By

Published : Jun 2, 2020, 6:17 PM IST

बुलडाणा- जिल्ह्यातील आज (मंगळवारी) 2 जूनला खामगाव कोविड रुग्णालयातील 9 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचे अभिनंदन करून त्यांना खामगावच्या कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 42 झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61 टक्के झाले आहे. ही आकडेवारी दिलासा देणारी आहे.

डिस्चार्ज देण्यात आलेल्या पैकी जळका भडंग येथील 8 तर टुनकी येथील एकाचा समावेश आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये 5 पुरुष व 4 महिलांचा समावेश आहे. प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबवलेल्या उपाय योजनांमुळे सदर रूग्ण बरे झाले आहे. त्यांना आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून स्वागताने घरी पाठवले. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि परिचारिका यांनी टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णही आनंदाच्या भावमुद्रेत बाहेर पडले. कोरोना बाधित आढळलेल्या या रूग्णांना शासनाच्या निकषांनुसार वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे लक्षणे नसल्यामुळे बाधित रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज पेपर देण्यात दिला. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलेश टापरे उपस्थित होते. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 42 वर पोहचली असून बाधित रुग्णांची संख्या आता 69 वर पोहचली आहे. यात कोरोना बाधित मृत्यू व्यक्तींची संख्या 3 आहे तर सध्या कोविड रुग्णालयात 24 जणांवर उपचार सुरू आहेत.

सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.